शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बसप्रवासात गोंधळ करून लुटमार करणारी महिलांची टोळी गजाआड; हिंजवडी पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 21:21 IST

आरोपी महिला मुळच्या सोलापूर येथील असून, मुंबई - बेंगळुरू महामार्गावर लुटमार करीत असल्याचे तपासात निष्पन्न

ठळक मुद्दे १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी : बसमध्ये प्रवाशांसोबत वाद घालून गाेंधळ करून लुटमार करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे. याप्रकरणी सात महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी महिला मुळच्या सोलापूर येथील असून, मुंबई - बेंगळुरू महामार्गावर लुटमार करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली. 

अर्चना मनोहर देवकर (वय ३७, रा. घाटकोपर, वेस्ट मुंबई, मूळ रा. किरपे, ता. कराड, जि. सातारा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी या कराड ते मुंबई असा प्रवास करीत होत्या. त्याच बसने आरोपी सात महिला प्रवास करीत होत्या. दरम्यान सुतारवाडी ते राधा चाैक दरम्यान आरोपी सात महिलांनी फिर्यादी यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच आरोपी महिलांनी फिर्यादी यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिने असलेली पर्स, १० हजारांची रोकड, तसेच सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण एक लाख ८३ हजार २०० रुपयांचा ऐवज हिसका मारून जबरदस्तीने घेऊन पळून जात होते. याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर धाव घेत आरोपी महिलांना ताब्यात घेतले.   

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, उपनिरीक्षक नंदराज गभाले, पोलीस कर्मचारी अविनाश सगर, तानाजी टकले, विजय बंजत्री, रेखा धोत्रे, तेजश्री म्हैशाले, भाग्यश्री जमदाडे, पुनम आल्हाट यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

बंगळुरू-मुंबई महामार्गावर लुटमारआरोपी महिला मूळच्या सोलापूर येथील आहेत. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर लहान मुलांना सोबत घेऊन बसने प्रवास करून दागिने तसेच माैल्यवान ऐवज असलेल्या प्रवासी महिलेशी आरोपी वाद घालत. भांडणादरम्यान गोंधळाचा फायदा घेऊन एक आरोपी महिला दागिने, रोकड, माैल्यवान वस्तूंची चोरी करीत असे. महामार्गावरील कराड, सातारा, चांदणी चाैक, वाकड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा पद्धतीने आरोपींनी बऱ्याच चोरी केल्याची शक्यता आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटक