गॅस चोरी करणाऱ्या टोळीला अटक

By Admin | Updated: June 10, 2017 02:11 IST2017-06-10T02:11:05+5:302017-06-10T02:11:05+5:30

गॅस टँकरमधून घरगुती वापराच्या गॅसची चोरी करणाऱ्या परप्रांतिय टोळीच्या तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

The gang was arrested for stealing gas | गॅस चोरी करणाऱ्या टोळीला अटक

गॅस चोरी करणाऱ्या टोळीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : गॅस टँकरमधून घरगुती वापराच्या गॅसची चोरी करणाऱ्या परप्रांतिय टोळीच्या तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
खबऱ्याकडून माहिती मिळाल्याने सुदुंबरे (ता. मावळ) गावाच्या शिवारात मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. कारवाईत दोन हजार किलो वजनाचा सुमारे एक लाख रुपये किमतीचा घरगुती वापराचा गॅस व ८० सिलिंडर टाक्या जप्त करण्यात आले. टँकरचालक लक्ष्मण गुजर त्याचे साथीदार महिपाल बिष्णोई, महेंद्र बिष्णोई, विजय बिष्णोई, गोपाळ बिष्णोई, बाळू रोटे, प्रदीप सिंग, राकेश जाजू या आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने बुधवार (दि. १४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मावळ तालुक्यातून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून मोठ्या प्रमाणात घरगुती वापराच्या गॅस टँकरची वाहतूक होते. गॅस चोरीच्या प्रकाराने नागरिक त्रस्त होते. या कारवाईत २ हजार किलो वजनाचा घरगुती गॅस किंमत ९६,१४० रुपये, दोन मालवाहू वाहने व गॅस टँकरमधून गॅस सिलिंडर टाकीत भरण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

Web Title: The gang was arrested for stealing gas