शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

गजबजतोय देहूगावचा मजूर अड्डा, ठेकेदार, कामगारांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:06 IST

येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे. काही प्रमाणात पैशांची बचतही होत आहे.देहूगाव हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असले तरी सध्या पिंपरी-चिंचवडच्या जवळ असल्याने सर्र्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने वेगाने विस्तारत आहे. नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षणाच्या बहुतेक सर्वच सोयी अवघ्या काही किलोमीटर अंतरावर उपलब्ध होत आहेत. शासनाकडून गावात अनेक विकासकामे झाली आहेत. दळणवळणाच्याही सोयी उपलब्ध असल्याने शहरात महागडी सदनिका खरेदी करण्यापेक्षा येथे स्वत:ची जागा घेऊन टुमदार घर बांधण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. येथे अनेक गृहसंकुलांचे काम सुरू असून शहरापेक्षा खूप किमतीत सदनिका उपलब्ध होत आहेत. त्यामुळे येथील जागेला चांगली मागणी वाढली असून, तेथे बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीमुळे विकसनशील देहूगावात मध्यमवर्गीय व कामगार क्षेत्रातील कामगार येथे घरास प्राधान्य देऊ लागले आहेत.बांधकाम क्षेत्रासाठी कामासाठी स्थानिक कामगार कमी पडत असल्याने आणि येथे रोजगार चांगला उपलब्ध होत असल्याने येथे राज्यातील औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांसह देशातील मध्य प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमधील बांधकाम क्षेत्रातील गवंडी कारागीर व त्यांच्या हाताखाली काम करणारे सुमारे ३०० ते ४०० मजूर येथे रोज सकाळी आठ ते दुपारी बारा दरम्यान आपले टिकाव, फावडी, घमेली यांच्यासह थापी, रंधा असे साहित्य घेऊन येथील प्रवेशद्वार कमानीजवळ येऊन उभे राहतात. ठेकेदार आपणास आवश्यक त्या लोकांची निवड करून रोजगार ठरवून घेऊन वाहनातून घेऊन जातात. जर काम मिळाले तर कामावर जायचे, नाहीतर घरी जायचे असा येथील या कामगारांचा शिरस्ता झाला आहे. सध्या देहूगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे कामगारांना चांगलीच मागणी असल्याने येथे दिवसेंदिवस कामगारांची गर्दीदेखील चांगलीच वाढत आहे. त्यामुळे सकाळी दहाच्या सुमारास ठेकेदार व कारागीर आणि मजुरांच्या रोजगारासाठी संबंधितांशी बोली होताना पहायला मिळते. यामुळे वाहनांची चांगलीच गर्दी होते. या गर्दीमुळे चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथून आळंदी आणि देहूरोडकडे रस्ते जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा थांबविण्यासाठी हे कामगार रस्त्याच्या कडेला कमानीखाली मोकळ्या जागेत थांबतात. मात्र, वाहनचालक हे गर्दी पाहून वेग कमी करतात व वहातुकीची गती मंदावते परिणामी वहातुकीचा खोळंबा होत जात आहे.कामाची आशा : काही जणांकडून फसवणूकयेथील मजूर अड्ड्यावरील कामगार सुभाष लष्करे म्हणाले की, येथे देशाच्या आणि राज्याच्या विविध भागांतून कामगार आलेले असून, सकाळी आठ वाजल्यापासून काम मिळेल या आशेवर उभा राहतो, काम मिळाले तर कामावर जायचे नाहीतर घरी जायचे. गवंड्यासाठी ५०० ते ६०० रुपये रोज व बिगारी पुरुषासाठी ४०० रुपये, महिला बिगारीसाठी २०० ते ३०० रुपये रोज मिळतो. काम झाल्यावर लगेच पैसे घेतले जातात.मात्र, काम जास्त असेल तर कामाच्या प्रमाणात विश्वासावर दोन तीन दिवस कामगार थांबतात. काही लोक काम संपत आले की सुटी होण्याच्या वेळी पैसे देण्यास टाळा टाळ करतात व भ्रमणध्वनी बंद ठेवतात. रोज नाही मिळाला तर बहुतांशी मजुराच्या घरची चूल पेटणे अवघड होते. काही लोक काम करून घेतात व पैसे बुडवितात. हाही अनुभव आल्याचे लष्करे यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे