शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हुक्क्याच्या धुरात हरवतेय पिंपरी शहरातील तरुणांचे भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 14:14 IST

राज्यात बंदी घालण्यात आलेले हुक्का पार्लर पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरू

ठळक मुद्देमहाविद्यालय व आयटी कंपन्या टार्गेट.. हप्तेगिरीमुळे या सर्व प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे सुरू आयुर्वेदिक कंपन्यांच्या नावाने हुक्का सुरू असणारा हा गोरखधंदा तेजीत सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना संपर्क शहरातील अकरा ठिकाणी हुक्का पार्लर बिनबोभाटपणे सुरू

पिंपरी : उद्योगनगरीच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाबरोबर अवैध धंदे व गुन्हेगारीचा आलेखही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नामांकित शाळा, महाविद्यालये व आयटी कंपन्यातील तरुण पिढी आकर्षणापोटी व सहज उपलब्धतेमुळे हुक्क्याच्या धुरात आपले भविष्य हरवत चालली आहेत.  राज्यात बंदी घालण्यात आलेले हुक्का पार्लर पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरू आहेत. देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी हुक्क्याच्या जाळ्यात अडकत चालली आहे. सोशल मीडियावर आयुर्वेदिक पदार्थ म्हणून हुक्क्याच्या जाहिराती बिनबोभाटपणे सुरू आहेत. मात्र, हप्तेगिरीमुळे या सर्व प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे सुरू आहे. तंबाखूजन्य पदार्थात मोडणाऱ्या हुक्का प्रकारावर राज्य शासनाने २०१८ पासून बंदी घातली आहे. हुक्क्याच्या नशेला आहारी जाणारी युवा पिढीची संख्यावाढत आहे. आयटी कंपन्यांमुळे महाराष्ट्रातील व परराज्यांतील तरुणांची मोठी संख्या उद्योगनगरीत वास्तव्यास आहे. या तरुणांना गिऱ्हाईक म्हणून हुक्क्यासाठी टार्गेट केले जात आहे. शहरातील अकरा ठिकाणी हुक्का पार्लर बिनबोभाटपणे सुरू आहेत. आयुर्वेदिक कंपन्यांच्या नावाने हुक्का सुरू असणारा हा गोरखधंदा तेजीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना संपर्क केला जात आहे. आकर्षक जाहिरातबाजी करून तरुणांना विविध व्यसने व नशेच्या आहारी ओढले जात आहे. यातील काही पार्लरमध्ये अवैधरित्या मद्यविक्री केली जात आहे.  शहरातील महाविद्यालयीनविद्यार्थी व आयटी क्षेत्रात काम करणारी युवा पिढी हुक्का पार्लरमध्ये रात्रभर झिंगत पडलेले असतात. रंगीबेरंगी आणि संगीताच्या तालावर ठेका धरणारी ही तरुणाई व्यसनाच्या आधीन झाल्याने त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. यामुळेही गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. अशा हुक्का पार्लरमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. त्याचे गंभीर परिणाम पुढील पिढ्यांना सोसावे लागणार आहेत.................हिंजवडी, रावेतमध्ये सर्वाधिक पार्लरशहरातील जास्तीत जास्त हुक्का पार्लर हिंजवडी व रावेत या भागात आहेत. हॉटेल व मॉलमध्येही हुक्का पार्लर सुरू करण्यात आली आहेत. येथे हुक्क्याच्या विविध प्रकार ग्राहकांना पुरविले जात आहेत. उच्चभ्रू राहणीमान असलेले अनेक आयटीयन्स व विद्यार्थी हुक्का पार्लरच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSmokingधूम्रपानStudentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालयITमाहिती तंत्रज्ञान