शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीवर मोफत प्रवास

By admin | Updated: August 8, 2015 00:35 IST

महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संमगवाडी ते विश्रांतवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रावेत ते औंध या दोन मार्गावरील

पुणे : महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संमगवाडी ते विश्रांतवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रावेत ते औंध या दोन मार्गावरील बीआरटीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गांचा वापर दोन्ही महापालिकांमधील जास्तीत जास्त नागरिकांनी करावा, यासाठी काही मार्गांवर उद्घाटनानंतर एक महिना मोफत बस प्रवासाची सुविधा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळाच्या तातडीने झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णयघेण्यात आला असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, येत्या दहा दिवसांमध्ये बीआरटी मार्गाचे उद्घाटन अपेक्षित असून बीआरटीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले. केंद्रशासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुर्ननिर्माण योजनेअंतर्गत आळंदी आणि नगर रस्त्यावर एकूण सोळा किलोमीटर लांबीचा बीआरटी मार्ग विकसीत करण्यात आला आहे. त्यापैकी आळंदी रस्त्यावरील संगमवाडी ते विश्रांतवाडी हा कॉरिडॉर येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. या मार्गांसाठीच्या बस, ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती, चालक-वाहकांचे प्रशिक्षण, आयटीएमएस यंत्रणा आदीबाबतची कायर्वाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्ग सुरु करण्यासंदर्भात संचालक मंडळाची तातडीची सभा शुक्रवारी झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा अश्?विनी कदम, अभिषेख कृष्णा, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, राजीव जाधव, जितेंद्र पाटील उपस्थित होते. दरम्यान, बीआरटी बसची प्राथमिक चाचणी सध्या सुरू आहे. आयुक्त राजीव जाधव यांनी सांगवी-किवळे मार्गाची पाहणी केली. तसेच, बसमध्ये बसून प्रवास केला. आयुक्तांनी विद्युत, उद्यान विभागाच्या कामांची पाहणी केली. बसथांबा, पथदिवे, गतिरोधक, सिग्नल यंत्रणेची पाहणी करण्यात आली. तसेच, आयुक्तांनी काही ठिकाणी सुरू असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. (प्रतिनिधी)