शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज

By नारायण बडगुजर | Updated: December 19, 2023 18:26 IST

बनावट सही करून ग्राहकाच्या नावाने बँकेतून ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केली

पिंपरी : मोबाईल खरेदीसाठी कर्ज करून देतो, असे सांगत ग्राहकाकडून कागदपत्रे घेतली. तसेच बनावट सही करून ग्राहकाच्या नावाने बँकेतून ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केली. याप्रकरणी एकाला अटक केली. पुनावळे येथील साईसिद्धी मोबाईल सेंटर येथे १४ ते १५ जुलै २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. 

सिकंदर श्रावण भालेराव (४३, रा. पुनावळे) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि. १८) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शरद बाळू जाधव, असे अटक केलेल्याचे नाव आहे.  

पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, शरद जाधव हा एका बँकेचा एक्झीकेटीव्ह म्हणून काम करतो. ग्राहकांना मोबाईल घेण्यासाठी शरद जाधव बँकेकडून कर्ज मिळवून देत होता. पुनावळे येथील साई सिद्धी मोबाईल सेंटर येथे फिर्यादी भालेराव मोबाईल घेण्यासाठी आले. मोबाईलसाठी कर्ज होईल का, असे त्यांनी विचारले. मी कर्ज मिळवून देतो, असे जाधव याने सांगितले. त्याने भालेराव यांची कागदपत्रे घेऊन कर्जासाठीची प्रक्रिया केली. मात्र, कर्ज मिळण्यात अडचण आहे, असे सांगत त्याने भालेराव यांना बँकेचे कर्ज मिळवून दिले नाही. त्यानंतर भालेराव यांनी दुसऱ्या बँकेचे कर्ज करून मोबाईल खरेदी केला. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना बँकेतून फोन आली की, तुम्ही गेली सहा महिने मोबाईल लोनचे हप्ते भरले नाही. त्यावेळी चौकशी केली असता आपल्या नावावर जुलै महिन्यात ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढल्याचे भालेराव यांना समजले. तसेच ही रक्कम व्याजासह ५५ हजार २२९ एवढी झाली असल्याचेही त्यांना बँकेने सांगितले. त्यानंतर भालेराव यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.  

अशी केली फसणूक...

शरद जाधव याने भालेराव यांच्या नावावर कर्ज मंजूर करून घेत मोबाईल शॉपमधून नवीन मोबाईल घेतला. तो मोबाईल बाजारात विकून त्याचे पैसे स्वत:कडे ठेवले. या फसवणुकीच्या प्रकारानंतर लगेचच शरद जाधव याने दुसऱ्या एका ग्राहकाला फसविण्याची तयारी केली. मात्र, हे करत असताना मोबाईल शॉप मालकाने त्याची तक्रार बँकेकडे केली.    काही मोबाईल शॉपबाहेर लोन करून देणारे असतात. यामध्ये काही तरुण नागरिकांची फसवणूक करतात. कागदपत्रांचा वापर करून परपस्पर कर्ज काढले जाते. मोबाईल लोनच्या नावाखाली फसवणूक झाल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. - प्राची तोडकर, पोलिस उपनिरिक्षक, रावेत

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी