शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची कामे मिळविण्यासाठी खोटे दाखले सादर करून फसवणूक; दोन ठेकेदारांविरोधात पिंपरीत गुन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 18:47 IST

पिंपरी महापालिकेची कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांनी अनुभवाचे बनावट कागदपत्रे सादर केले.

पिंपरी : महापालिकेची कामे मिळविण्यासाठी अनुभवाचे बनावट कागदपत्रे सादर केले. महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. 

पहिल्या प्रकरणात मे. राजेश इंजिनिअर्स ॲन्ड कंपनीचे मालक रेवजी सहादू घाडगे (वय ६९, रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी रामनाथ निवृत्ती टकले (वय ५५, रा. रावेत) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २) फिर्याद दिली. ही घटना २४ मार्च २०१९ रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घाडगे याने हिंदूस्थान ऍन्टीबायोटिक्‍स लिमिटेड या शासकीय संस्थेचे खोटे अनुभवाचे प्रमाणपत्र तयार करून ते पिंपरी -चिंचवड महापालिकेला सादर केले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे एक कोटी दोन लाख ९१ हजार ९८२ रुपयांचे निविदेद्वारे काम मिळवून महापालिकेची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत.

दुसऱ्या प्रकरणात मे. संजीवन प्रिसीजनचे प्रो. संजीव यशंवत चिटणीस (वय ६५, रा. बिबेवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेचे अधिकारी प्रवीण विठ्ठल लडकत यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २) फिर्याद दिली. ही घटना ७ ते २१ जानेवारी २०२१ या कालावधीत घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काम मिळविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडे निविदा भरली. त्यासाठी पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभागातील पर्वती जल शुद्धीकरण केंद्र येथे क्‍लोरीन साठवणुकसाठी शेड उभारणे, दहा किलो/ तास क्षमतेचे क्‍लोरिनेटर्स पुरवणे, क्लोरीन न्युट्रलायझेशन यंत्रणा बसविणे व तद्अनुषंगिक कामे केले असल्याचा कार्यकारी अभियंता (विद्युत) कार्यालयाकडील २९ नोव्हेंबर २०१८ रोजीचा बनावट दाखला तयार केला. तो दाखला महापालिकेकडे सादर करून महापालिकेची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस