दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:20 IST2017-08-02T03:20:39+5:302017-08-02T03:20:39+5:30

दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास अटक केली. त्यातील एक आरोपी फरार झाला आहे.

Four accused arrested for the robbery | दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना अटक

दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना अटक

पिंपरी : दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास अटक केली. त्यातील एक आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल अशोक गायकवाड (वय २०), नितीन शरद पवार (वय २५), अतिष ऊर्फ पप्पू कोंडीराम काळे (वय २४), विनोद प्रकाश बाबर (वय २१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दाद्या ऊर्फ कृष्णा गणेश भोसले हा आरोपी फरार आहे. सर्व आरोपी भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत राहणारे आहेत. अधिक तपास भोसरी एमआयडीसीचे पोलीस करीत आहेत.

Web Title: Four accused arrested for the robbery