पिंपरी चिंचवडमधील विठ्ठलनगराजवळील नाल्यात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 11:44 IST2018-02-22T11:44:01+5:302018-02-22T11:44:28+5:30

नेहरूनगर, विठ्ठलनगरजवळील नाल्यात सकाळी ९च्या सुमारास अंदाजे ३५ वर्ष वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. सतीश गुलाबराव घाडगे असे त्याचे नाव आहे.

Found dead body near Vitthal nagar, Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमधील विठ्ठलनगराजवळील नाल्यात आढळला मृतदेह

पिंपरी चिंचवडमधील विठ्ठलनगराजवळील नाल्यात आढळला मृतदेह

ठळक मुद्देविठ्ठलनगरमधील रहिवाशांनी पोलिसांना दिली नाल्यात मृतदेह असल्याची माहितीअण्णासाहेब मगर स्टेडियम नजीकच्या नाल्यात पाच महिन्यांपूर्वी घडली होती अशीच घटना

पिंपरी : नेहरूनगर, विठ्ठलनगरजवळील नाल्यात सकाळी ९च्या सुमारास अंदाजे ३५ वर्ष वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. सतीश गुलाबराव घाडगे असे त्याचे नाव आहे.
विठ्ठलनगरमधील रहिवाशांनी नाल्यात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी पोलीस ठाणे तसेच संत तुकाराम नगर पोलीस चौकीचे अधिकारी घटनास्थळी गेले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयाकडे पाठविला आहे. खून की आत्महत्या अशी चर्चा असून पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले
अशीच घटना अण्णासाहेब मगर स्टेडियम नजीकच्या नाल्यात पाच महिन्यांपूर्वी घडली होती, ए्का महिलेचा मृतदेह पोत्यात भरून टाकण्यात आला होता, पोलीस तपासात तिच्या पतीनेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले होते.

Web Title: Found dead body near Vitthal nagar, Pimpri Chinchwad