शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad | ॲट्रॉसिटीची धमकी देणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 15:00 IST

गुन्हा दाखल झालेल्यापैकी एक राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक आहे...

पिंपरी : ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यापैकी एक राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक आहे. ही घटना गुरुवारी (दि. ५) दुपारी मंडल अधिकारी कार्यालय, लांडेवाडी भोसरी येथे घडली. याप्रकरणी अधिकारी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी नगरसेवक काळूराम मारुती पवार, अशोक किसन बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन), सागर बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून ‘तू आमच्या विरोधात निकाल का दिला. तू इथे नोकरी कशी करते तेच मी बघतो,’ अशी धमकी देत फिर्यादीकडील कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच चिखली येथे बैलगाडा शर्यती असल्याने बैलगाडा शर्यतीच्या घाटाचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली आणि रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा आणला.

आरोपी काळूराम पवार याने फिर्यादी यांना ‘तुझ्यावर ॲट्रॉसिटीची केस करून तुला जेलमध्ये टाकतो,’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाNCPराष्ट्रवादी काँग्रेसbhosariभोसरी