पिंपरी - उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची मैत्री आहे. ती अधिक घट्ट होण्यासाठी सतेज पाटील तुम्ही भाजपात जावा, असा सल्ला माजी राज्यपाल व काँगे्रसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी उच्चतंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पिंपरीत झालेल्या कार्यक्रमांत दिला. त्यानंतर तावडे यांनीही आपल्या भाषणात सतेज पाटील यांच्या भाजपा प्रवेशाविषयी सकारात्मकता दर्शविल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमासाठी तावडे उपस्थित होते. डी. वाय. पाटील यांच्या विधानाचा धागा पकडत विनोद तावडे म्हणाले, ‘दादां’चा (डॉ. डी. वाय. पाटील) सल्ला ऐकायचा की नाही, तुमच्यावर अवलंबून आहे. आम्हाला माहिती आहे की सतेज पाटील हे काँगे्रसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना भाजपाकडून आवतन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 01:36 IST