शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

उद्योगनगरी तापाने फणफणली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 13:10 IST

वातावरणात बदल : दहा महिन्यांत ७१ हजार ५४६ रुग्ण, रुग्णालये हाऊसफुल 

ठळक मुद्दे डेंगी, मलेरिया, चिकुनगुणिया आणि स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले

विश्वास मोरे-  पिंपरी : वातावरणातील बदलाने पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी तापाने फणफणली असून, महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. गेल्या दहा महिन्यांत शहरात ७१ हजार ५४६ तापाचे रुग्ण आढळले आहेत. डेंगी, मलेरिया, चिकुनगुणिया आणि स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे ताप उतरविण्याचे मोठे आव्हान आरोग्य आणि वैद्यकीय विभागासमोर आहे. रुग्ण वाढत असले तरी साथीच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण यावर्षी घटल्याचे दिसून येत आहे. जुलैमध्ये सुरू झालेला पावसाळा नोव्हेंबरपर्यंत कायम आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि सायंकाळी पाऊस असा वातावरणात बदल होत असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दहा महिन्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर तापाचे रुग्ण वाढत असून, मलेरिया, डेंगी आणि स्वाइन फ्लू सदृश्य रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. तापाने शहर फणफणले आहे. याबाबत उपाययोजना म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने प्रबोधन, जागृतीपर उपक्रम राबविला आहे. प्रभाग निहाय आरोग्य कर्मचाºयांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ......मलेरिया लक्षणे - ताप, थंडी वाजणे, सांधे दुखणे, उलट्या होणे....चिकुनगुनियालक्षणे - आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताप येणे, डोकेदुखी, तीव्र सांधेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे किंवा उलट्या होणे, डोळ्यांचा दाह होणे..........डेंग्यूलक्षणे - ताप, स्नायू दुखणे, सांधे दुखी, डोके दुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे.......... हे जरूर करारपाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात स्वच्छ धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाका ........

न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळा, पावसात अधिक काळ भिजू नका....चार महिन्यांतझाली वाढहिवाळ्याचा महिना सुरू झाला असताना पावसाचे प्रमाण आहे़ वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढतात. जलजन्य आजारांचेही प्रमाण वाढत असते. दूषित पाण्यामुळे सर्दी, खोकला किंवा उलट्या,  ताप अशी लक्षणे आढळून येत असतात. स्वच्छ पाणी साचून डेंगीचे डास निर्माण होत असतात. त्यामुळे उपाययोजना म्हणून रुग्णांवर उपचार, तपासणी करून निदान करणे, तसेच आरोग्य विभागातर्फे  स्वच्छतेसाठी कीटकनाशकांची फवारणी केली जाते. डास निर्माण होणाºया डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून उपाययोजना करण्याचेही काम केले जाते. तसेच प्रबोधनही केले जाते. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच परिसर स्वच्छता आणि पाणी साचणार नाही अशी दक्षता घेणे गरजेचे आहे. - डॉ. पवन साळवे, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख......रुग्णालयात बेड उपलब्ध होईनात?महापालिकेच्या वतीने शहर परिसरात दवाखाने, बाह्यरुग्णसेवेसाठी २६ रुग्णालये कार्यरत असून खासगी रुग्णालयांचीही संख्या अधिक आहे. महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि चिंचवड येथील कामगार विमा रुग्णालय, नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातही साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.  डेंगी सदृष्य तापाचे रुग्ण अधिकचार महिन्यांत डेंगी सदृश्य तापाचे रुग्ण वाढले आहेत. जुलैमध्ये १०७, आॅगस्टमध्ये २८१, सप्टेंबरमध्ये ५३१, आॅक्टोबरमध्ये ९४८ असे १८६७ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून तर एनएसवनचे रुग्ण ५४ असल्याचे आढळून आले आहे. मात्र, डेंगीमुळे शहरात एकही मृत्यू झालेला नाही......... वातावरणातील सततच्या बदलामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार बळावतात. शरीराची प्रतिकारकशक्ती संतुलित ठेवण्यासाठी शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याचे योग्य सेवन करणे. तसेच रुग्णांमध्ये ताप, सर्दी अशा आजारांची लक्षणे आढळल्यास त्वरित वैैद्यकीय अधिकाºयांचा सल्ला घ्यावा.-डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय..................महिना    तापाचे रुग्ण    मलेरिया    डेंगी    चिकुनगुनिया    स्वाइन फ्लू        पॉझिटिव्ह        मृत्यू    सदृश्य        पॉझिटिव्ह    सदृश्य    पॉझिटिव्ह    पॉझिटिव्ह    मृत्यूजानेवारी    ५,८१३    ०        ०    ८६        ०    ०        ०    ५    ०फेब्रुवारी    ५,२८१    ०        ०    १५        ०    २        ०    ७    १मार्च    ४,८०१    ०        ०    ९        ०    २        ०    ०    ०एप्रिल    ५,८४१    ०        ०    १९        ०    ०        ०    ४    १मे    ५,३८७    ०        ०    १९        ०    ०        ०    ०    ०    जून    ५,१६८    ०        ०    ४३        ०    ०        ०    १    १जुलै    १०,२१८    ३        ०    १०७        २८    ०        ०    २    ०आॅगस्ट    १२,३९२    ४        ०    २८१        ४०    ०        ०    ०    ०सप्टेंबर    ८,५४६    ०        ०    ५३१        ४४    २        ०    ०    ०आॅक्टोबर    ८,०९९    २        ०    ९४८        ६३    ०        ०    ०    ०    एकूण    ७१,५४६    ९        ०    २,०५८    १८४    ६        ०    १९    ३ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdengueडेंग्यूRainपाऊसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर