शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे गुरवला पाच वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:59 IST

कोयता व सिमेंटच्या गट्टूने दोन रिक्षा, दोन दुचाकीसह अन्य एका वाहनाची पाच जणांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच एका जणाला कानाखाली चापट मारून त्याच्या खिशातील सुमारे एक हजार दोनशे रुपये काढून घेतले. पिंपळे गुरव येथे रविवारी हा प्रकार घडला. 

पिंपरी : कोयता व सिमेंटच्या गट्टूने दोन रिक्षा, दोन दुचाकीसह अन्य एका वाहनाची पाच जणांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच एका जणाला कानाखाली चापट मारून त्याच्या खिशातील सुमारे एक हजार दोनशे रुपये काढून घेतले. पिंपळे गुरव येथे रविवारी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी विनोद रतन गायकवाड (वय ३१, रा. गांगर्डेनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॅनियल चांदणे, जोग्या, लाल्या, अभिजित ढमाले (सर्व रा. जुनी सांगवी) व गणेश मोटे (रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गायकवाड रिक्षाचालक असून, त्यांची स्वत:ची रिक्षा आहे.          फिर्यादी गायकवाड शनिवारी रात्री जेवण करून त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर बसले होते. त्यावेळी साडेबाराच्या सुमारास आरोपी दोन दुचाकीवरून तेथे आले. त्यानंतर आरोपी जोग्या म्हणाला, ‘‘येथे का बसला आहे. योग्या जगतापच्या जिवावर उड्या मारता का? त्याच्याकडे आता बघतोच.’’ तसेच फिर्यादी गायकवाड यांच्या कानाखाली चापट मारून त्यांच्या शर्टाच्या खिशातील सुमारे एक हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी गायकवाड यांच्या रिक्षासह आणखी एक रिक्षा, दोन दुचाकी व अन्य एका वाहनाची अशा एकूण पाच वाहनांची कोयता व सिमेंटच्या गट्टूने तोडफोड करून नुकसान केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक