शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पाच अट्टल दरोडेखोरांना अटक; ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 21:58 IST

औरंगाबाद, अक्कलकोट येथील जंगलातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी पाच अट्टल दरोडेखोर आणि घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. औरंगाबाद, अक्कलकोट येथील जंगलातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कारवाईनंतर दरोड्याचा एक आणि घरफोडीचे पाच असे सहा गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपींकडून ४७ लाख ५० हजार रुपयांचे ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार, आप्पा रा. भोसले (वय ४०, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) त्याची साथीदार पत्नी सारिका संतोष चौगुले उर्फ पायल आप्पा भोसले, अक्षय मंगेश शिंदे (वय २२, रा. काजी तडमस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), अजय रिका उर्फ राहुल पवार (रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार: रात्रीच्या वेळी घराच्या खिडक्यांचे गज कापून आत प्रवेश करून घरफोडी व चोरी करणाऱ्या टोळीपैकी एक आरोपी लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार हा औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे आश्रयास आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून औरंगाबादमधील वाळुंज येथून त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे चौकशी करून त्याने चोरी केलेले ३३ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

आरोपी लिंग्या याला तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यात वर्ग करून अधिक तपास केला असता त्याने त्याच्या चार साथीदारांची नावे सांगितली. तसेच, त्याच्याकडून आणखी १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

लिंग्या याचे साथीदार अक्कलकोट, सोलापूर, उस्मानाबाद, करमाळा येथील जंगलभागात वास्तव्य करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना मिळाली. त्यानुसार चार टीम तयार करून आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आल्या. पोलिसांनी अक्कलकोट परिसरात वेशांतर करून चार दिवस वॉच ठेवून जंगलात वास्तव्य करणाऱ्या आप्पा भोसले, त्याची पत्नी सारिका आणि अक्षय या तिघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांचा पाचवा साथीदार अजय याला देखील पोलिसांनी अटक केली.

सर्व आरोपींकडून पोलिसांनी एकूण ४७ लाख ५० हजारांचे ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तीन, देहूरोडमधील दोन घरफोडीचे, तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील दरोड्याचा एक, असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी पाच घरफोडीच्या गुन्ह्यात हे आरोपी पसार होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस अंमलदार धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसोडे, नितीन बहिरट, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत दयानंद खेडकर, धनंजय भोसले, संदीप ठाकरे, राजकुमार इघारे, श्यामसुंदर गुट्टे, गणेश मालुसरे, गोपाळ ब्रह्मादे, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास आवटी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGoldसोनंjewelleryदागिनेArrestअटकPoliceपोलिसRobberyचोरी