पिंपरी-चिंचवडमध्ये गॅसगळतीमुळे घराला आग, 5 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:20 AM2018-12-31T11:20:39+5:302018-12-31T11:34:17+5:30

पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथील एका घराला गॅसगळतीमुळे सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत.

five injured in Pimpri-Chinchwad house fire | पिंपरी-चिंचवडमध्ये गॅसगळतीमुळे घराला आग, 5 जण जखमी

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅसगळतीमुळे घराला आग, 5 जण जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथील एका घराला गॅसगळतीमुळे सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागली आहे.आगीमध्ये कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. कासारवाडीत केशव नगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही घटना घडली.

पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथील एका घराला गॅसगळतीमुळे सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश असून जखमींना उपचारासाठी तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडीत केशव नगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही घटना घडली. बिरादार कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत शोभा बिरादार, विजय जाधव , गणेश बिरादार, शुभम बिरादार, देवांश बिरादार हे जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल आणि घरातील इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. 

Web Title: five injured in Pimpri-Chinchwad house fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.