शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 17:26 IST

मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे.

मावळ ( पिंपरी चिंचवड) : रविवार सुट्टीचा दिवस, पर्यटकांसाठी घातवार ठरला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळल्याने वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. अधिकच्या माहितीनुसार, घटनास्थळी तळेगाव पोलीस, पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, पी एम आर डी ए अग्निशामक दल, लष्कराचे  एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात घालवण्यात आले आहे तर एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 

दरम्यान, मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे.  इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे. आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात.  पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक लोखंडे आणि काँक्रीटमध्ये असणारा पूल कोसळला. आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात कोसळले.अचानक घडलेल्या या घटनेने या ठिकाणी तारांबळ उडाली. काही तरुणांनी पाण्यातून वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केलाआणि पुलावर असणारे अनेक जण नदीच्या पाण्यात वाहून गेले. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघ्याची  गर्दी झाली होती. त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले आहे व पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेतला जात आहे.

पुल अत्यंत जुना झालेला; प्रशासनाचे दुर्लक्षइंद्रायणी नदीवरील कुंडामाळा येथील पूल अत्यंत जुना झाला आहे या संदर्भातील फलक या ठिकाणी लावला होता. या पुलाची दुरुस्ती ही अनेक वेळा केली आहे.  तरीही त्या ठिकाणाहून वाहने नेण्यात येत होती. तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातmavalमावळPuneपुणे