शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

निर्बंधानंतरही फटाक्यांचा धूर, हवेची गुणवत्ता धोकादायकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 00:57 IST

निर्बंधानंतरही फटाक्यांचा धूर : मागील वर्षीच्या तुलनेत प्रदूषणात वाढ

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर यंदाच्या वर्षीपासून निर्बंध लागू केल्यानंतरही यंदाच्या दिवाळीत हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी खालावलेलीच दिसून येत आहे. पुणे शहरात मागील वर्षीच्या दिवाळीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११९ इतका होता, त्यामध्ये यंदाच्या वर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये ९ अंकांनी वाढ होऊन तो १२७ इतका झाला आहे.

वातावरणातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ० ते ५० पर्यंत आरोग्यास चांगला असतो. परंतु पुणे शहरात वाहनांची वाढती संख्या, धूळ आदींमुळे ६० ते ८० च्या दरम्यान असतो. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाजविल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये जाते. दिवाळीमध्ये होणाºया या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट वेळेतच फटाके वाजविण्याचे निर्बंध घालून दिले. यंदाच्या वर्षीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडविण्यास परवानगी देण्यात आली. या निर्बंधानंतर किमान मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधार होण्याची अपेक्षा होती. मात्र ती पूर्णपणे फोल ठरली आहे. सफर संस्थेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार यंदाच्या दिवाळीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२७ इतका राहिला, मागील वर्षी (२०१७) हा १२७ इतका होता, तर २०१६ मध्ये तर १६८ इतका होता. शहरातील कर्वे रस्त्यावरच्या सह्याद्री हॉस्पिटलजवळ दिवाळीच्या काळात हा निर्देशांक १८७ पर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. तो सातत्याने १०० च्या पुढेच राहिला आहे.

फटाके उडविण्याबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे चित्र दिवाळीच्या ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिसून आले. विशेषत: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात सर्वत्र खूपच मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात आले. न्यायालयाने महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर सुमारे १४ दिवस हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावर देखरेख करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच विक्री होणाºया फटाक्यांची तपासणीही करण्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी दिवाळीच्या काळातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावर सातत्याने लक्ष ठेवून होते. पुणे शहराच्या विविध भागांतून त्याबाबतची आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रसिद्ध केला जाणार आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहवाल जाहीर करणारन्यायालयाने दिलेल्या निर्देशानुार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या काळात पुणे शहराच्या विविध भागांतून हवेच्या गुणवत्ता निर्देशांकांची आकडेवारी व माहिती गोळा केली आहे. या आकडेवारीचे विश्लेषण करण्याचे काम सध्या सुरू असून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रसिद्ध केला जाणार आहे.हवेचा गुणवत्ता निर्देशांक तक्ता० ते ५० : चांगली : आरोग्यावर परिणाम नाही५१ ते १०० : साधारण : आजारी व्यक्तीस श्वसनास त्रास११० ते २०० : धोकादायक : अस्थमा, हृदयरोग असणाºयांना त्रास,फुफ्फुस अशक्त असणाºयांवर परिणाम२०१ ते ३०० : वाईट : सर्वसाधारण व्यक्तींनाही श्वसनास त्रास३०१ ते ४०० : खूप वाईट : सर्वांनाच अशक्तपणा४०१ ते ५०० : तीव्र : आरोग्य चांगले असणाºयांवरही तीव्र परिणाम 

टॅग्स :fire crackerफटाकेPuneपुणेpollutionप्रदूषणDiwaliदिवाळी