शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

अखेर तिढा सुटला! चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 10:01 IST

मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटनेही दावा केलेला होता

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवारीचा तीन दिवस सुरू असणारा तिढा सुटला असून नाना काटे यांना मंगळवारी सकाळी उमेदवारी जाहिर केली आहे. मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक जाहिर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास चोविस तास उरले आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून सोमवारी दिवसभर उमेदवारी जाहिर केली नाही. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार, निरिक्षक आणि आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी इच्छुकांची मनधरणी केली.

राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, माया बारणे, राजेंद्र जगताप हे इच्छुक होते. त्यांची मनधरणी करण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू होते. नेते आणि इच्छुकांमधील चर्चांची खलबते दिवसभर सुरू होती. तसेच या मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटनेही दावा केलेला होता. त्यामुळे तिघांपैकी नक्की हा मतदारसंघ कोणाला सोडला जाईल, याबाबत उत्सुकता होती. उमेदवारीचे घोंगडे भिजत पडले होती.

सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये रात्री बैठक झाली. त्यात उमेदवारीवर चर्चा करण्यात आली. रात्री बारापर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही. मतदार संघ राष्ट्रवादीला गेला आहे.  मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटील