शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची व हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 00:16 IST

मारहाण नेमकी कशावरून झाली हे कारण अद्यापही गुलदस्त्यात

ठळक मुद्देयाप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दाखल झाला नव्हता गुन्हा

पिंपरी :  महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची, हाणामारी होण्याची घटना सोमवारी (दि.१ )सायंकाळी पावणे सातला झाली. मात्र, मारहाणीचे कारण गुलदस्त्यात आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

कोरोना लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने सर्वसाधारण सभा झाली नव्हती.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तीन महिन्याच्या तहकूब सभा पार पडल्या. तर, चौथी सभा गणसंख्येअभावी तहकूब झाली. सभा संपल्यानंतर नगरसेवक मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आले. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास तिथे भाजपचा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी बसले होते, त्याच ठिकाणी शिवसेनचे राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे आले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली,  चढ्या आवाजात चर्चा सुरू होती. चर्चेचे रूपांतर हाणामारीत झाले. जोरदार हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मारहाण सुरू असताना भाजपच्या एका महिला पदाधिकारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भांडण थांबले.

दरम्यान, मारहाण नेमकी कशावरून झाली हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.भाजपचे पदाधिकारी हे भोसरीतील असून शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे वाकड येथील आहेत. या घटनेनंतर रात्री पोलीस महापालिकेत दाखल झाले होते, मडीगेरी याना चिंचवड च्या रुग्णालयात तर कलाटे बंधूंना पिपरीतील महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली नव्हती.......

खासगी वाटाघाटीच्या माध्यमातून भूसंपादनाचा विषय मागील स्थायी समितीत गाजला होता. तसेच गेल्या समितीतील टक्केवारीचा हिशेब मावळत्या अध्यक्ष यांनी सदस्यांना दिला नव्हता. या दोनपैकी कोणत्या कारणावरून हाणामारी झाली याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही.......... सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महापालिका भवनात भाजपा नगरसेवकास मारहाण झाली. ही बाब चांगली नाही, शोभनीय नाही, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत.".......शाब्दिक वाद झाला, "आम्ही कुणालाही मारहाण केली नाही, समोरची व्यक्ती आमच्या अंगावर धावून आली, असे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीshravan hardikarश्रावण हर्डिकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस