शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
3
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
4
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
5
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
8
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
9
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
10
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
11
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
12
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
14
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी
15
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
16
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
17
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
18
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
19
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
20
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 

पिंपरी शहरात मास्क वाटप प्रकरणात पन्नास लाखांचा भ्रष्टाचार, शिवसेनेची मुख्यमंत्र्याकडे दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:53 IST

प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी जनाची नाही तर मनाची लाज वाटणे गरजेचे होते.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र

पिंपरी : कोरोना व्हायरस या रोगाच्या काळात शहरातील गरजू झोपडपट्टी मधील गरीब नागरिकांच्या नावाचा गोंडस वापर करून दीड कोटीचे मास्क खरेदीमध्ये ५० लाखाचा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी जनाची नाही तर मनाची लाज वाटणे गरजेचे होते. एकीकडे अनेक कंपन्या, सामाजिक संस्था मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य मोफत पुरवत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, व सत्ताधारी पदाधिकारी मात्र मेलेल्या मढ्यावरचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत. महिला बचत गटांना काम दिले ती चांगली गोष्ट आहे. परंतु, त्यांच्या नावाखाली चुकीची कामे करणे योग्य नाही. मास्क वाटप प्रकरणात दीड कोटीच्या कामात पन्नास लाखाचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.उबाळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. उबाळे म्हणाल्या, विविध  महिला बचत गटाने सहा रुपयांना कापडी मास्क तेही चांगल्या दर्जाचे बनविले आहेत व त्याचे वाटप गरजू लोकांना केले देखील. मास्क बनविताना शहरातील सर्व बचत गटांना आव्हान केले असते तर महानगरपालिकेचे ५० लाख रुपये वाचले असते पण आपल्या राज्यात अंधेर नगरी चौपट राजा असे कामकाज चालू आहे. लाईफबॉय साबण खरेदीत ही असाच भ्रष्टाचार करून दुप्पट दराने खरेदी झाली आहे हे धंदे थांबवावेत व मास्क खरेदी प्रकरणाची चौकशी करून जास्तीची रक्कम जबाबदार अधिकारी यांचयकडून वसूल करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाshravan hardikarश्रावण हर्डिकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेfraudधोकेबाजीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस