शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुनेवर खुनी हल्ला करून सासऱ्याची घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 14:53 IST

मयत वृद्धांविरोधात गुन्हा दाखल...

पिंपरी : वृद्धाने हत्याराने डाेक्यावर मारहाण करून सुनेच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सासऱ्याने केलेल्या या हल्ल्यात सून गंभीर जखमी झाली. बेलठिकानगर, थेरगाव येथे शुक्रवारी (दि. २०) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. 

सूर्यकांत मारूती वनवे (वय ७४) , असे आत्महत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मयत सूर्यकांत वनवे यांचा मुलगा सुशील सूर्यकांत वनवे (वय ३८, रा. बेलठिकानगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २०) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयत सूर्यकांत वनवेे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशील यांचे वडील मयत सूर्यकांत यांनी फिर्यादीच्या पत्नीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोणत्यातरी हत्याराने मारहाण केली. यात फिर्यादी सुशील यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर फिर्यादीचे वडील सूर्यकांत यांनी त्यांच्या स्वत:च्या घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली.

याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादी सूशील यांची पत्नी यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेThergaonथेरगावCrime Newsगुन्हेगारी