शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पालकाला भरावी लागली फी

By admin | Updated: August 11, 2015 03:47 IST

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह रीतसर अर्ज करूनही रेशनकार्डमध्ये नाव नसल्याचे कारण देत अर्ज नाकारण्याचा प्रकार हवेली तहसील कार्यालयाकडून घडला आहे.

पिंपरी : उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह रीतसर अर्ज करूनही रेशनकार्डमध्ये नाव नसल्याचे कारण देत अर्ज नाकारण्याचा प्रकार हवेली तहसील कार्यालयाकडून घडला आहे. रेशनकार्डमध्ये नाव असतानाही अर्ज फेटाळल्याने शैक्षणिक शुल्क भरण्याची पाळी पालकांवर आली आहे. मात्र, अर्जातून रेशनकार्डची झेरॉक्सच गायब झाल्याचे सोमवारी (दि. १०) उघडकीस आले. रेशनकार्डमध्ये दोघींची नावे असतानाही सदर कारण दिल्याने त्यांना धक्का बसला. शुल्क भरण्याची मुदत संपत असल्याने तुरुकमारे यांनी अकरावीसाठी १५ हजार रुपये आणि दुसरीसाठी ११ हजार रुपये जमा केले. विनंती केल्याने संबंधित संस्थेने एकूण शुल्कात हप्ते दिल्याने त्यांनी ते भरले. त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. वडिलांच्या उपचारासाठी जवळची रक्कम खर्ची झाली आहे. पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून तडजोड करून त्यांनी हे शुल्क भरले. मात्र, आवश्यक कागदपत्रे देऊनही उत्पन्नाचा दाखला नाकारल्याने त्यांना मानसिक ताण आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पद्धतीने असंख्य पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तुरुकमारे सोमवारी (दि. १०) चौकशीसाठी कार्यालयात गेले असता, अर्जातून रेशनकार्डची झेराक्स प्रतच गायब असल्याचे दिसले. या संदर्भात नायब तहसीलदार पुनाजी थिटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘या संदर्भात कारवाई सुरू आहे. संबंधितांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. योग्य कार्यवाही केली जात आहे.’’ (प्रतिनिधी)दहा दिवसांनी दिले नामंजुरीचे पत्रबौद्धनगर, पिंपरी येथील भीमराव तुरुकमारे यांच्या एका मुलीस मोरवाडीतील एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत अकरावीत प्रवेश मिळाला आहे, तर लहान मुलगी पिंपरीतील आर्य समाज मंदिर विद्यालयात दुसरीस आहे. या दोघींच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी म्हणून उत्पन्न दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी तुरुकमारे यांनी १० जुलैला आकुर्डीतील हवेली तहसील कार्यालयात अर्ज केला. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केली. मात्र, रेशनकार्डमध्ये दोघींची नावे नसल्याचे कारण देत, दहा दिवसांंनी त्यांना नामंजुरीचे पत्र दिले.