शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

निकामी झालेल्या होडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 2:22 PM

वराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ५० केली होती. परंतू अद्याप पूल झाला नाही.

ठळक मुद्देमुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर नाणोली गावची लोकसंख्या तेराशेवर

पिंपरी: इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या तेराशेवर आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मागॅ म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर करतात. सध्या येण्याजाण्यासाठी असलेल्या होडीची अवस्था मात्र अतिशय बिकट झाली असून होडीच्या तळाला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे होडीत पाणीसुध्दा येते. अशा धोकादायक होडीतून हे चिमुकले शाळेला गेले. हे भीषण वास्तव आहे वडगाव मावळ तालुक्यातील नाणोली आणि वराळे गावच्या ग्रामस्थांची....  गेल्या तीन पिढ्यांपासून शेतकरी,महिला,विद्यार्थी यांना नदीवर पूल नसल्याने इंद्रायणीच्या नदीपात्रातून निकामी झालेल्या होडीतने प्रवास करावा लागतो. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी होडीतून प्रवास करून शाळा गाठली. इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या तेराशेवर आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे इतर गावांतील शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर करतात. सध्या असलेली होडीची अवस्था बिकट झाली असून तळाला छिद्रे पडली आहेत.त्यामुळे होडीत पाणी येते. .......................   होडी चालविणा-यांची तिसरी पिढी गावक-यांनी दिलेल्या बलुत्यावर तीन पिढ्यांपासून नावाड्यांचे कुटूंबीय उदरनिर्वाह करीत आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा बांधल्या आहेत. त्या तारेच्या आधारे होडी ओढून नाव पुढे नेली जाते. सुरवातील दत्तोबा गऱ्हाणे यांनी होडी चालवली. यानंतर मुलगा बळीराम आणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करत आहे. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतात. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांची सेवा आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे. परंतु, सध्या महागाईचे दिवस आहेत. नुसत्या धान्यावर घर चालत नाही. शासनाने अथवा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन दिले पाहिजे असे बिबाबाई गºहाणे यांनी सांगितले. ...................                    शासनाला जाग कधी येणारवराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ५० वर्षांपूर्वी केली होती. १९८५ मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी भूमिपूजन केले होते.परंतू अद्याप पूल झाला नाही. सध्याची होडी निकामी झाली असून नवीन होडी द्यावी तसेच या पूलाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी माजी सभापती धोंडीबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे,अरूण लोंढे,संतोष लोंढे,मल्हारी कोंडे यांनी केली आहे.जिल्हापरिषद सदस्य नितीन मराठे म्हणाले जिल्हापरिषेकडून नवीन नाव लवकर आणण्यात येईल. 

टॅग्स :mavalमावळSchoolशाळाStudentविद्यार्थीindrayaniइंद्रायणी