शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कन्येची राजपत्रित अधिकारी पदाला गवसणी! निरगुडीची लेक मयुरी राज्यात मुलींमध्ये तिसरी…

By प्रकाश गायकर | Updated: January 4, 2025 18:53 IST

मयुरी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथे झाले.

पिंपरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राजपत्रित अधिकारी पदाच्या स्पर्धा परीक्षेत मयुरी प्रतिभा सुरेश कदम यांनी महाराष्ट्रात मुलींमध्ये तिसरा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले आहे.मूळच्या पुणे जिल्ह्यातील निरगुडी गावातील एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या मयुरी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथे झाले. माध्यमिक शिक्षण श्री वाघेश्वर विद्यालय, चऱ्होली बुद्रुक, आणि उच्च माध्यमिक शिक्षण मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर, पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांनी आळंदी येथील एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीची पदवी मिळवली.प्रशासन क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा त्यांना त्यांचे वडील आणि भावाकडून मिळाली. शालेय आणि महाविद्यालयीन काळात सामाजिक परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी लोकसेवेसाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या तयारीच्या काळात त्यांची आई, मोठी बहीण, आणि भाऊ यांनी त्यांना संपूर्ण साथ दिली.मयुरी कदम यांच्या या यशामुळे त्यांना समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘या यशामुळे आनंद होत असून, समाजसेवेसाठी उत्तम कार्य करण्याचा निर्धार आहे,’ असे मयुरी यांनी सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMPSC examएमपीएससी परीक्षाexamपरीक्षाStudentविद्यार्थी