शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत बनावट सही, शिक्का वापरून तयार केला खोटा दस्त; न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:50 IST

२०१७ ते २८ मार्च २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला

पिंपरी : कंपनीचा बनावट शिक्का तयार करून तसेच बनावट सही खोटा दस्त तयार केला. यातून व्यावसायिकाची आणि न्यायालयाची फसवणूक केली. पिंपरी येथे ४ डिसेंबर २०१७ ते २८ मार्च २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. रोहित शंकर काळभोर (वय ३५), शंकर नामदेव काळभोर (वय ५८, दोघे रा. प्राधिकरण, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पवन मनोहरलाल लोढा (वय ३४, रा. निगडी प्राधिकरण) यांनी बुधवारी (दि. १६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. कोहिनूर ट्रेडहोम प्रा. ली. या कंपनीचे संचालक रोहित काळभोर आणि व्यवस्थापक शंकर काळभोर यांना फिर्यादीच्या एक्साया अ‍ॅलॉईज प्रा. ली. या कंपनीने विश्वासाने अनामतपोटी धनादेश दिला होता. त्या धनादेशाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी व फिर्यादीच्या कंपनीचे नुकसान व्हावे यासाठी धनादेश वटवण्यासाठी बँकेत भरला. फिर्यादीच्या कंपनीचा खाते उतारा न्यायालयात दाखल केला. त्यावर फिर्यादीची बनावट सही करून एक्साया अ‍ॅलॉईज प्रा. ली. या कंपनीचा बनावट शिक्का तयार करून खोटा दस्त तयार केला. तसेच हा खोटा दस्त खरा आहे असे भासवले.

त्यानंतर न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यातील खाते उतारा हस्ताक्षर पडताळणीसाठी पाठवला. त्यात फिर्यादी यांची सही आणि खाते उताऱ्यावरील सहीमध्ये तफावत आढळून आली. आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीचा बनावट शिक्का आणि सही करून फिर्यादीची फसवणूक केली. तसेच न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पतंगे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालयfraudधोकेबाजी