शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पिंपरीत बनावट चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; तीन संशयित आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 13:31 IST

दोन लाख ९८ हजारांच्या बनावट नोटा जप्त

ठळक मुद्देबनावट नोटांच्या रॅकेटमध्ये आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता

पिंपरी : बनावट चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोन लाख ९८ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी सोमवारी (दि. १७) अटक केली आहे. पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली. अभिषेक प्रदीप कटारिया (वय १९, रा. आनंद पार्क, थेरगाव), ओंकार शशिकांत जाधव (वय १९, रा. केशवनगर, चिंचवड), सुरेश भगवान पाटोळे (वय ४०, रा. ओंकार नगर, पाटेवस्ती, आनंदवन आश्रम, फुगेवाडी), असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शहाजी वसंत धायगुडे (वय ३४) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रविवारी (दि. १६) रात्री पावणेदहाच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुंबई - पुणे महामार्गावर आकुर्डी येथील खंडोबामाळ चौकाजवळ नाकाबंदी केली. त्यावेळी रात्री साडेदहाच्या सुमारास खंडोबामाळ चौकाकडून एक लाल रंगाचे चारचाकी वाहन आले. त्या वाहनाला दुचाकी आडवी घालून थांबविले. वाहन पळवून नेण्याबाबत वाहनातील दोघांनी पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये २ लाख ९८ हजार रुपये मिळून आले. त्यामध्ये दोन हजारांच्या १४९ बनावट चलनी नोटा होत्या. त्यांनी दोन जणांकडून या नोटा आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, पुरूषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी शहाजी धायगुडे, उमेश वानखडे, जावेद बागसीराज यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

..........................

आणखी संशयित आरोपींचा शोधबनावट नोटांच्या रॅकेटमध्ये आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. त्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत. तसेच अटक केलेल्या आरोपींकडून आणची गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक