विनयभंग करणाऱ्या भोंदू मौलवीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:31 IST2018-04-16T02:31:09+5:302018-04-16T02:31:09+5:30
आजारी महिलेवर उपचार करण्याचे आमिष दाखवून जादुटोण्याच्या आधारे तिच्यावर आणि तिच्या सासूवर बलात्कार व अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भोंदू मौलवीचा जामीन न्यायालयाने दुस-यांदा फेटाळला.

विनयभंग करणाऱ्या भोंदू मौलवीचा जामीन फेटाळला
पुणे - आजारी महिलेवर उपचार करण्याचे आमिष दाखवून जादुटोण्याच्या आधारे तिच्यावर आणि तिच्या सासूवर बलात्कार व अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भोंदू मौलवीचा जामीन न्यायालयाने दुस-यांदा फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मणेर यांनी हा आदेश दिला.
आरोपीच्या घराच्या झाडाझडतीमध्ये जादुटोण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
हैदरअली अब्दुलरशिद शेख (वय ४७, रा. सातारा) असे भोंदू मौलवीचे नाव आहे. याबाबत कोंढवा भागात राहणाºया ३६ वर्षीय महिलेने खडक पोलिसात फिर्याद दिली आहे.