शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...!

By नारायण बडगुजर | Updated: December 8, 2023 23:37 IST

इतरांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हावे म्हणून केकसाठी शोभेचा फटाका तयार करणाऱ्या सहा महिलांचा अक्षरश: कोळसा झाला.

पिंपरी : तळवडे येथील फटाक्यांच्या (फायर क्रॅकर) अनधिकृत कारखान्यात शुक्रवारी दुपारी स्फोट झाला आणि होत्याचे नव्हते झाले. या स्फोटाने कारखान्याच्या भिंती हादरल्या आणि महिला मजूर होरपळल्या. इतरांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हावे म्हणून केकसाठी शोभेचा फटाका तयार करणाऱ्या सहा महिलांचा अक्षरश: कोळसा झाला.

तळवडेतील ज्योतिबानगरात गेल्या काही महिन्यांपासून शोभेच्या फटाक्यांचा कारखाना सुरू होता. या कारखान्यात १५ ते २० महिला मजूर काम करीत. कमी पगारात हे जोखमीचे काम त्यांनी स्वीकारले होते. अग्निशामक दलाकडे आणि महापालिकेकडेही या कारखान्याची नोंद नाही. हा सगळाच कारभार अनधिकृत सुरू होता. पंधरा फूट उंचीच्या चार भिंती आणि त्यावर पत्र्याचे छत असलेल्या शेडमध्ये कारखाना सुरू होता. केवळ एक शटरचा दरवाजा आणि एकच खिडकी असल्याने वायुविजनाची पुरेशी व्यवस्थाही नव्हती. अशा बंदिस्त ठिकाणी फटाक्यांच्या दारूगोळ्याचे काम सुरू होते.

दुपारचे एकत्रित जेवण ठरले अखेरचेदररोज सकाळी नऊला कारखान्यात काम सुरू व्हायचे. मजूर महिला दुपारच्या जेवणाचे डबे घेऊन येत. शुक्रवारी दुपारी मजूर महिलांनी एकत्र येत गप्पा मारत जेवण केले. त्यानंतर त्यांनी सर्वांचे रिकामे डबे एकाच ठिकाणी ठेवले. जेवण उरकून लगेचच पुन्हा फटाक्यांचे काम सुरू केले. मात्र, त्यानंतर दुर्घटना घडली आणि एकत्र जेवतानाचा आनंदाचा क्षण अखेरचा ठरला. ते डबे काळेठिक्कर पडले होते.

जीव वाचविण्याची धडपड आणि चपलांचा खचस्फोटानंतर जखमी महिला कारखान्यातून बाहेर पडण्यासाठी जिवाचा आकांत करीत होत्या. मात्र, केवळ एकच दरवाजा आणि तोही अर्धवट उघडा असल्याने बाहेर पडण्यात अडचणी आल्या. सर्वत्र धूर झाल्याने आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत असतानाही जखमी महिला दरवाजाजवळ धडपडत आल्या. तेथे त्यांच्या चपलांचा खच पडला होता.

भिंतींना तडे आणि धूरस्फोटामुळे हादरे बसून कारखान्याच्या भिंतींना तडे गेले. कारखान्यात मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याचा धूर झाला. यात कारखान्यातील कपाट, पॅकिंगचे साहित्य, तसेच फटाक्याच्या कांड्याही खाक झाल्या. इलेक्ट्रिक वायरिंगही जळाले. कारखान्याच्या भिंतींसह छताचा पत्रा काळवंडला होता.

बाहेर पडता आले असते तर...कारखान्याला आणखी दरवाजे असते तर कदाचित मजूर महिलांना लवकर बाहेर पडता आले असते. धूर शेडबाहेर पडून श्वास घेण्यास त्रास झाला नसता. मात्र, एकच दरवाजा आणि एकच खिडकी असल्याने धूर आणि मजूर कारखान्यातच अडकले. 

टॅग्स :fireआगfire crackerफटाकेDeathमृत्यू