शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

चापेकर बंधूंच्या हौतात्माचे चिरंतन स्मरण राहावे : देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 4:00 PM

क्रांतीकारकांच्या बलिदानाचे मोल समजले नाही तर स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे देशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा : देवेंद्र फडणवीस

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्मारकाची निर्मिती

पिंपरी चिंचवड : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पिंपरी चिंचवड शहराचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले गेलेले आहे. या शहराला दैदिप्यमान इतिहासाची परंपरा आहे. या इतिहासाला त्यागाची आणि देशसेवेची किनार देणाऱ्या चापेकर बंधूंच्या हौतात्म्याचे चिरंतन स्मरण सर्वांना राहायला हवे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर चापेकर बंधूंविषयी गौरवोद्गार काढले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणा-या क्रांतिवीर चापेकर बंधूंचे चिरंतन स्मरण राहावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगावात उभारण्यात येणा-या त्यांच्या भव्य सहा मजली स्मारकाच्या दुस-या टप्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.चिंचवडगावातील मोरया गोसावी क्रीडांगण येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे,आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, रवि नामदे, सतिष गोरडे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार आदी उपस्थित आहेत. फडणवीस म्हणाले, जो समाज इतिहास विसरतो, त्याला वर्तमानकाळ असतो, मात्र, भविष्यकाळ नसतो. क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकातून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. संग्रहालयात क्रांतीकारकांची आठवण जागृत ठेवली जाणार आहे. क्रांतीकारकांच्या बलिदानाचे मोल समजले नाही तर स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे. देशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा. नवीन पिढीला सुराज्य द्यावे लागेल.समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, क्रांतीवीर चापेकर समृती संग्रहालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ऐतिहासिक आहे. चापेकर बंधूंनी देशात आदर्श निर्माण केला. आता या स्मारकापासून तरुणांना निश्चित प्रेरणा मिळेल.  

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस