तोतया पोलिसावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 2, 2017 02:11 IST2017-06-02T02:11:49+5:302017-06-02T02:11:49+5:30

पोलीस असल्याची बतावणी करून तरुणाची लुबाडणूक करून पळून जाणाऱ्या तोतया पोलिसाला दिघी पोलिसांनी बुधवारी पडकले.

Entrance filed with the Intelligence Police | तोतया पोलिसावर गुन्हा दाखल

तोतया पोलिसावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून तरुणाची लुबाडणूक करून पळून जाणाऱ्या तोतया पोलिसाला दिघी पोलिसांनी बुधवारी पडकले. त्याच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमनाथ पोपट फडतरे (वय ३७, रा. भेकराईनगर, हडपसर), असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने पुणे आळंदी-पुणे रस्त्यावर बालाजी बांडे (वय ३०, रा. चिखली) यांना पाठीमागून येऊन मी पोलीस आहे. वाहनाची कागदपत्रे दाखव, असे सांगत ५०० रुपये आणि कागदपत्रे घेतली. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना पोलीस दिसले, आरोपी दुचाकीवरून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

४० हजारांचा ऐवज जप्त
माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून आरोपी सोमनाथ याला पकडले. त्याच्याकडून तीन मोबाईल, एक दुचाकी, ७०० रुपयांची रोकड, अधार कार्ड, वाहनपरवाना, असा एकूण ४० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Entrance filed with the Intelligence Police