शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Pune: बर्थडे पार्टीला बोलावून इंजिनिअर तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार; हिंजवडीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 10:43 IST

पिंपरी : जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख करून इंजिनिअर तरुणीस लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर इंजिनिअर तरुणानेतिच्याशी मैत्री करून बर्थडे पार्टीला ...

पिंपरी : जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख करून इंजिनिअर तरुणीस लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर इंजिनिअर तरुणानेतिच्याशी मैत्री करून बर्थडे पार्टीला बोलावून बलात्कार केला. भुमकर चौक, हिंजवडी येथे नोव्हेंबर २०२१ मध्ये ही घटना घडली. 

निशांत हरीश चंदनानी (वय ३४, रा. रतलाम, मध्य प्रदेश) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित तरुणीने सोमवारी (दि. २४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी इंजिनिअर असून ती घटस्फोटित आहे. त्याच प्रमाणे आरोपी देखील इंजिनिअर असून घटस्फोटित आहे. दुसरे लग्न करण्यासाठी पीडित तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर नाव नोंदणी केली होती. त्या वेबसाईटवरून आरोपीने पीडित तरुणी सोबत ओळख केली. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून आरोपीने पीडित फिर्यादी तरुणीशी मैत्री केली.

त्यानंतर आरोपीने त्याच्या वाढदिवसानिमित्त भुमकर चौक, हिंजवडी येथील त्याच्या राहत्या घरी आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीसाठी पीडित तरुणीला बोलावले. रात्री उशिरा पार्टी संपली. तू एकटी तुझ्या घरी जाऊ नको, रात्र झाली आहे. उद्या सकाळी जा, असे म्हणून आरोपीने फिर्यादी तरुणीला त्याच्या भुमकर चौक येथील घरी थांबवून घेतले. त्यानंतर फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले. तसेच फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण करणारे कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंगhinjawadiहिंजवडीpimpri-acपिंपरी