शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

प्रियकराने प्रेयसीसाठी दिला बायकोला घटस्फोट अन् घडलं असं काही की त्यानं संपवलं आयुष्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:54 IST

प्रेयसीच्या विरोधात गुन्हा दाखल...

पिंपरी : इंजिनियर असलेल्या तरुणाला महाविद्यालयातील प्रेयसी लग्नानंतर अचानक भेटली. त्यानंतर त्यांच्यातील जुने प्रेम पुन्हा बहरले. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र त्यानंतर प्रेयसीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रेयसीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

आत्महत्या केलेल्या ३५ वर्षीय इंजिनियर तरुणाच्या ६४ वर्षीय वडिलांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालायातील एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. मात्र महाविद्यालयीन शिक्षणानंतर तरुण आणि त्याची प्रेयसी यांची ताटातूट झाली. दरम्यान, इंजिनयरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणाला नोकरी लागली. त्याचे लग्न झाले. त्याला अपत्य प्राप्तीही झाली. सारेकाही सुरळीत असताना त्याची आणि महाविद्यालयीन प्रेयसी असलेल्या तरुणीची अचानक भेट झाली. त्याच्या प्रेयसीचेही लग्न झाले होते. तसेच ती प्रेयसी एका बाळाची आई देखील झाली असल्याचे तरुणाला समजले. मात्र तरीही जुन्या प्रेमाने उचल खाल्ली. 

तरुण इंजिनियर आणि त्याची प्रेयसी यांच्यातील ‘प्रेम’ पुन्हा बहरले. मात्र दोघांचेही लग्न झाल्याने त्यांना त्याचा अडसर वाटत होता. दोघांनी लग्न करायचे ठरवले. त्यासाठी तरुणाने त्याच्या पत्नीला आणि त्याच्या प्रेयसीने तिच्या पतीला घटस्फोट देण्याचे ठरले. त्यानुसार तरुणाने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र त्याच्या प्रेयसीकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तरुणाचा भ्रमनिरास झाला. प्रेयसी प्रतिसाद देत नसून आपल्याला त्रास देत आहे, आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय नाही, असे एका चिठ्ठित लिहून इंजिनियर तरुणाने १३ डिसेंबर २०२१ रोजी हिंजवडी येथे राहत्या घराच्या फॅनला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी ४ एप्रिलला याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी तरुणीला दीड वर्षांची मुलगी आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड