पोटनिवडणूक प्रचाराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 01:34 IST2016-01-09T01:34:25+5:302016-01-09T01:34:25+5:30
काळभोरनगर पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शुक्रवारी सायंकाळी समारोप झाला. महापालिकेची प्रभाग क्रमांक

पोटनिवडणूक प्रचाराचा समारोप
पिंपरी : काळभोरनगर पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शुक्रवारी सायंकाळी समारोप झाला.
महापालिकेची प्रभाग क्रमांक २६ (काळभोरनगर) ही जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसह, भाजपा, शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू होता. या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचला प्रचाराचा समारोप झाला. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. मतदान करते वेळी मतदारांनी मतदार ओळखपत्र,
बँक पासबुक, शिधापत्रिका, वाहनपरवाना आदी ओळखपत्रे जवळ ठेवावीत, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)