सोळा बांधकामांवर अतिक्रमण कारवाई

By Admin | Updated: March 11, 2017 03:17 IST2017-03-11T03:17:01+5:302017-03-11T03:17:01+5:30

ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ५२, ताथवडे-पुनावळे येथे आज बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने बांधकामावर कारवाई केली.

Encroachment action on sixteen constructions | सोळा बांधकामांवर अतिक्रमण कारवाई

सोळा बांधकामांवर अतिक्रमण कारवाई

रहाटणी : ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ५२, ताथवडे-पुनावळे येथे आज बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने बांधकामावर कारवाई केली. त्यात सुमारे १६ बांधकामे उद्ध्वस्त केली.
महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यात ताथवडे-पुनावळे येथील ९ आरसीसी आणि ५ वीट बांधकाम व २ पत्राशेड अशा एकूण १६ बांधकामांवर (७८७ चौ. मी. किंवा ८४५९ चौ. फूट) कारवाई करण्यात आली. ही कारवाई कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब ढवळे, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली. त्यात १० महानगरपालिका
पोलीस, ३ जेसीबी मशिन, ट्रक, २ ट्रॅक्टर, १० मजूर व १० कर्मचारी सहभागी झाले होते.(वार्ताहर)

Web Title: Encroachment action on sixteen constructions