शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

अपु-या पाणीपुरवठ्याविरोधात एल्गार, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 3:55 AM

महापालिकेकडून वाकड आणि परिसरास अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ सभा घेऊन मोर्चा काढण्यात आला. पिंपरी-चिंचवड को-आॅप. हाउसिंग सोसायटीज् फेडरेशन (पुणे शहर ३) (महासंघ) यांच्या वतीने शनिवारी (दि. ३) सकाळी १०ला आंदोलन करण्यात आले.

वाकड -  महापालिकेकडून वाकड आणि परिसरास अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ सभा घेऊन मोर्चा काढण्यात आला. पिंपरी-चिंचवड को-आॅप. हाउसिंग सोसायटीज् फेडरेशन (पुणे शहर ३) (महासंघ) यांच्या वतीने शनिवारी (दि. ३) सकाळी १०ला आंदोलन करण्यात आले. ड्यू डेल सोसायटी ते दत्त मंदिर या मार्गावर निषेध मोर्चा काढण्यात आला. महापालिकेचे सहायक अभियंता प्रवीण धुमाळयांना मागण्यांचे निवेदन देण्यातआले.हाउसिंग सोसायट्यांमधील ३५०पेक्षा अधिक रहिवासी या वेळी उपस्थित होते. पाणीवाटपातील प्रशासनाच्या सापत्न वागणुकीबाबत या वेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आले. आपल्या स्वागतपर भाषणात महासंघाचे प्रतिनिधी सुधीर देशमुख यांनी संघाची उद्दिष्टे विशद करून त्यास वैधानिक स्वरूप प्राप्त होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देत ते म्हणाले की, जरी महासंघ वेगवेगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्नात असला, तरी अपुरा पाणीपुरवठा ही वाकड परिसरासाठी सदैव संवेदनशील बनलेली समस्या हाताळण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे.या भागातील रहिवाशांकडून कर संकलनाच्या माध्यमातून महापालिकेस भरपूर उत्पन्न मिळत आहे. तथापि प्रशासनाचे पाणीवाटपाचे तागडे अन्यत्र झुकलेले दिसून येते. आंदोलनाचा मार्ग स्वीकारूनदेखील महापालिकेच्या धोरणात काहीच फरक पडणार नसेल, तर महासंघास अन्य वैधानिक पर्यायांचा विचार करावा लागेल. ज्यामध्ये जनहित याचिका हादेखील पर्याय असू शकतो. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. किंबहुना या प्रभागातील महापालिका लोकप्रतिनिधी याबाबत प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यास पूरक अशीच संघाची भूमिका आहे, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.महासंघाचे प्रवक्ते अरुण देशमुख म्हणाले की, आंदोलनाची भूमिका घेण्यापूर्वी आम्ही महापालिका प्रशासनास वेळोवेळी निवेदने दिली होती; पण प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आम्हास हा मार्ग स्वीकारणे भाग पडले आहे.वाकडच्या पाणीप्रश्नावर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एक असून, त्याच्या सोडवणुकीसाठी आम्ही पक्षविरहित भावनेने प्रयत्नशील आहोत, असेराहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांनी या वेळी विशद केले. तुषार कामठे यांनी स्पष्ट केले की, कस्पटे वस्ती परिसरात बायपास पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे तेथील पाण्याच्या समस्येचे निराकरण झाले आहे.आपल्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सोसायट्यांनी महासंघाचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन महासंघाचे प्रतिनिधी सचिन लोंढे यांनी केले. महासंघाचे सचिव के. सी. गर्ग यांनी आभार मानले.कर भरण्याबाबत विचार करावा लागेलमहासंघाचे अध्यक्ष सुदेश राजे म्हणाले की, सामान्य नागरिकांनाएमएलडी अथवा टीएमसी ही तांत्रिक परिभाषा ठाऊक नसून, त्यांना पुरेसे पाणी हवे आहे. प्रामाणिकपणे करभरणा करूनदेखील प्रशासन पाणी पुरवठा करणार नसेल, तर कर भरावा की न भरावा यावर देखील गांभीर्याने विचार करावा लागेल.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड