बिलाची रक्कम पाहून वीजग्राहक चक्रावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:55 IST2017-08-01T03:55:26+5:302017-08-01T03:55:26+5:30
भोंगळ कारभार, मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून अंदाजे देण्यात आलेल्या वीजबिलांची रक्कम पाहून नागरिक चक्रावले आहेत.

बिलाची रक्कम पाहून वीजग्राहक चक्रावले
जाधववाडी : भोंगळ कारभार, मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून अंदाजे देण्यात आलेल्या वीजबिलांची रक्कम पाहून नागरिक चक्रावले आहेत. जीके पॅलिशिओ हाउसिंग सोसायटीत अनेक नागरिकांना १८००० ते २०००० वीज बिल आले असून, या आधीच्या बिलांमध्ये बरीच तफावत आहे.
या सोसायटीत एकूण ४६६ सदनिका आहेत. मीटर रीडिंग व्यवस्थित न घेतल्याने बिलावरील मीटरचे छायाचित्र अगदी अंधुक दिसत आहे. अंदाजित बिले दिल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप झाला आहे.वीज इतकी न वापरता भरमसाट बिले कशी आली, असा प्रश्न सोसायटीतील नागरिक विचारीत आहेत. इमारतीच्या जे विंगमधील एका रहिवाशाच्या बिलावर मीटरचे छायाचित्र नसताना १८००० रुपये बिल आले आहे. सोसायटीमधील एसटीपी बंद असताना देखील सोसायटीला ९०००० रुपये बिल आले आहे. केवळ याच सोसायटीला नव्हे, तर चिखली, मोशी, जाधववाडी, कुदळवाडी या भागात अनेक सोसायट्यांची अशीच तक्रार आहे. वाढीव व अंदाजित दिलेली बिले त्वरित दुरुस्त करण्यात यावीत व योग्य पद्धतीने मीटर रीडिंग घेतले जावे याकरिता महावितरणच्या कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.