शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

उद्योगनगरीमध्ये अठरा अनधिकृत खासगी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:54 IST

शहरात १८ खासगी शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. त्यांची यादी पालिकेने नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये १७ शाळा इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत, तर एक शाळा मराठी माध्यमाची आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले आहे.

पिंपरी - शहरात १८ खासगी शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. त्यांची यादी पालिकेने नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये १७ शाळा इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत, तर एक शाळा मराठी माध्यमाची आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले आहे. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पाल्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस पालक जबाबदार राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.शहरामध्ये काही खासगी प्राथमिक शाळा शासनाची परवानगी न घेता बिनदिक्कतपणे सुरू आहेत. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळांनी राजरोसपणे व्यवसाय चालवला आहे. या अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी संबंधित शाळेच्या संस्थांना नोटीसही बजावल्या आहेत. मात्र या नोटिशीकडे दुर्लक्ष करत या शाळा अनधिकृतरीत्या सुरू ठेवण्यातआल्या आहेत. शहरातील अशा एकूण १८ शाळांची यादी महापालिकेच्या शिक्षण मंडळे नुकतीच जाहीर केली आहे.शहरातील या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणाºया नुकसानीस पालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित अनधिकृत शाळांवर १९ आॅक्टोबर २०१० च्या कायद्यानुसार कारवाईचा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे.यादी उशिरा आल्याने पालक संतप्तअनधिकृत शाळांची यादी पालिकेने दोन महिन्यांपूर्वीच जाहीर करणे अपेक्षित होते. खासगी प्राथमिक शाळांचे प्रवेश मे महिन्यामध्येच पूर्ण केले जातात. त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी चार दिवस बाकी असताना महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने यादी कशासाठी जाहीर केली, असा संतप्त सवाल पालक करीत आहेत.शहरातील अनधिकृत शाळांची नावेग्रँड मीरा इंग्लिश स्कूल (मोशी)स्मार्ट स्कूल (मोशी प्राधिकरण)इंद्रायणी इंग्लिश मीडिअम स्कूल (साई पार्क दिघी)बुद्धिस्ट इंटरनॅशनल इंग्लिश मीडिअम स्कूल (मोशी)मास्टर केअर इंग्लिश मीडिअम स्कूल (भोसरी आळंदी रोड)ग्रँड मीरा इंग्लिशमीडिअम स्कूल (चिखली)जयश्री इंग्लिशमीडिअम स्कूल (चºहोली)मरिअम इंग्लिशमीडिअम स्कूल (भोसरी)पर्ल ड्रॉप स्कूल (पिंपळे निलख)ज्ञानराज प्राथमिक स्कूल (कासारवाडी)सेंट मेरीज् ज्युनिअर प्रायमरी स्कूल (पिंपळे निलख)माउंट कारमल पब्लिक स्कूल (सांगवी)शुभंकरोती इंटरनॅशनल स्कूल (गांधी पेठ,चिंचवड)एंजल्स प्राथमिक स्कूल(पिंपळे निलख)मॉडर्न पब्लिक स्कूल (रहाटणी)ब्लू रोज इंटरनॅशनलस्कूल (चिंचवड)बालगोपाल माध्यमिक शाळा (मराठी माध्यम,पिंपरी)

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड