शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बावधनमध्ये ‘दम मारो दम’; पबमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

By नारायण बडगुजर | Updated: January 14, 2025 17:14 IST

हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी पबवर कारवाई केली.  

पिंपरी : बावधन परिसरातील एका पबमध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब उघडकीस आली. हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी रविवारी (दि. १२) या पबवर कारवाई केली.  बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा (२१, रा. वाकड), राहुल श्रीकांत कुलकर्णी (३७, रा. भुगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १३) बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता गिऱ्हाईकांची गर्दी करून त्यांना जेवणास व हुक्का पिण्यास एकत्र बसविल्याचे आढळले. हॉटेलमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होता. याबाबत पोलिसांनी कारवाई करत हॉटेलमधील कामगार सौम्यरंजन आणि व्यवस्थापक राहुल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच या कारवाईमध्ये सहा हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पबमधील ग्राहकांमध्येही वादबावधन परिसरात बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो हा एकमेव मोठा पब आहे. हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. तसेच ग्राहकांचीही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पबमध्ये नेहमीच वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पबमध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये वाद झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.    

संबंधित हाॅटेलमधील दारू विक्रीचा परवाना एका महिलेच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच हाॅटेल मालकाचा शोध सुरू आहे. यात किती भागीदार आहेत? भाडेकरार आहे का? याबाबत तपास सुरू आहे. - अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक