शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला मिळतेय प्रोत्साहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 03:06 AM2018-12-10T03:06:18+5:302018-12-10T03:06:37+5:30

घटना घडली की अंमलबजावणीबाबत फक्त केली जाते चर्चा, पण प्रश्न ‘जैसे थे’च!

Due to the closure of the CCTV cameras in the city, the promotion of increasing criminal crime | शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला मिळतेय प्रोत्साहन

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला मिळतेय प्रोत्साहन

googlenewsNext

पिंपरी : वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा आता गरजेची झाली आहे. वाहनचोरी, घरफोडी, जाळपोळ ते अपहरणापर्यंतच्या घटना वारंवार घडत आहेत. यातील गुन्हेगारांपर्यंत पोहचणे पोलिसांसाठी अडचणीचे ठरत आहे. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने मोक्याच्या वेळी या कॅमेऱ्यांचा फायदाच होत नसल्याने हे सीसीटीव्ही कॅमेरे असून अडचण, नसून खोळंबा म्हणण्याची वेळ आली आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अजून कॅमेरे लावणे अत्यावश्यक झाले आहे. तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून, एमआयडीसीच्या वतीने मात्र अजूनही त्यावर कृती होत नाही. गुन्हेगारी, अपघाताचे प्रमाण, वाहतुकीचे प्रश्न डोके वर काढत आहेत. या सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मात्र नेहमी मनुष्यबळ कमी पडत असल्याची अधिकाºयांची उत्तरे यावर सक्षम उपाय म्हणून मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर असणे, गरजेचे होऊन बसले आहे.

तळवडे मुख्य चौकात कॅमेऱ्यांची आवश्यकता
तळवडे : येथे गुन्हेगारी फोफावत असून, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस होणारी वाहतूककोंडी हे प्रश्न निर्माण होत आहे. यावर कायमचा उपाय म्हणून मुख्य चौकात तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.
तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून एमआयडीसीच्या वतीने मात्र अजूनही त्यावर कृती होत नाही.
देहू, तळवडे या परिसरात कित्येक वेळा रस्त्यावरुन दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी महिलांचे दागिने हिसकावून पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कित्येक वेळेस आयटी अभियंत्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. रुपीनगर परिसरात टोळक्याने फिरणे, दुचाकीवर विनाकारण गोंगाट करत घिरट्या घालणे, वाहनांची तोडफोड करणे असे प्रकार घडले असून, या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यावर मात्र पोलीस प्रशासनाला मर्यादा येत आहेत.
तळवडे येथील सॉफ्टवेअर चौक, तळवडे गावठाण चौक, जोतिबानगर चौक, टॉवर लाइन चौक, त्रिवेणीनगर चौक, रुपीनगर येथील वंदे मातरम चौक, अचानक चौक, एकता चौक या परिसरात सीसीटीव्ही बसवून त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास गुन्हेगारीवर आळा बसेल. गुन्हेगारांना जरब बसेल. सुमारे वीस वर्षांपूर्वी तळवडे आणि परिसराचा महापालिकेत समावेश करण्यात आला असून, वीस वर्षांच्या काळात ग्रामीण ते शहर असा कायापालट तळवडे आणि परिसराचा होत आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा गरजेची
चिंचवड: वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा आता गरजेची झाली आहे. वाहनचोरी,घरफोडी, जाळपोळ पासून ते अपहरण पर्यंतच्या घटना वारंवार घडत आहे.यातील गुन्हेगारांपर्यंत पोहचणे पोलिसांसाठी अडचणीचे ठरत आहे.चिंचवडमधील विविध भागात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. सध्या चिंचवडमधील चापेकर चौक, गांधी पेठ, अहिंसा चौक,बिजलीनगरमार्गे, तानाजीनगर रोड, पुणे-मुंबई महामार्गावरील चौकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे.मात्र इतर भागात अजूनही ही यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.सध्या काही महत्त्वाच्या चौकात उपलब्ध असणारी यंत्रणा वाहतूक शाखेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी आहे. शहरात सुरू असणाºया सीसीटीव्ही यंत्रणेचे कंट्रोल रूम सध्या पुणे आयुक्तालयाशी जोडलेले आहे. शहराची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र आयुक्तालय उभारण्यात आले. मात्र सीसीटीव्ही यंत्रणेचे नियंत्रण अजून शहरातील आयुक्तालयात कार्यरत झालेले नाही. शहरातील नवे आयुक्तालय आता चिंचवडमधील प्रेमलोक पार्कमध्ये स्थलांतरित होणार आहे. या ठिकाणी शहरातील सीसीटीव्हीबाबत नियोजन होणार आहे. शहरातील विविध भागात याबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून, याचा अहवाल आयुक्तालयातून महापालिकेला सादर होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा
रहाटणी : रोजच शहरात वाढणारी गुन्हेगारी, या ना त्या करणारे होणारे अपघात यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने मोक्याच्या वेळी ह्या कॅमेºयांचा फायदाच होत नसल्याने हे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा म्हणण्याची वेळ आली आहे. मागील काही वर्षांपूर्वी काळेवाडी येथील काही भागात एकूण नऊ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले व त्याचा डिस्प्ले काळेवाडी पोलीस चौकीत ठेवण्यात आला आहे. मात्र अनेक वेळा काही कॅमेरे बंदच असतात. त्यामुळे कुठल्या रस्त्यावर काय घडते हे पोलिसांना कळतच नाही. सध्या बाजीप्रभू चौकातील
फक्त तीनच कॅमेरे सुरु आहेत बाकी सर्वच कॅमेरे बंद असल्याने तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. मागील काही वर्षांपूर्वी दुचाकीवरून येऊन मंगळसूत्र चोरीचे व मोबाईल हिसकावण्याच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ह्या कॅमेºयांचा फायदाही झाला; मात्र अनेक वेळा कॅमेरे बंदच असल्याने पोलिसांनाही त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हत्यार आहे पण त्याला धारच नाही अशी पोलिसांची अवस्था झाली आहे. रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे त्याचबरोबर पिंपळे सौदागर येथील पोलीस चौकीसमोरही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, मात्र हे कॅमेरे सुरु आहेत की नाही ह्याचा तपास नाही. कारण त्यांचे डिस्प्ले पुण्यात आहेत. खरे तर शहरातील व परिसरातील वाढती गुन्हेगारी पाहता मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व ते व्यवस्थित सुरु आहेत की नाही हे देखील वेळोवेळी तपासले पाहिजे ही काळाची गरज आहे.

सांगवीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी
सांगवी : सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया मुख्य चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे संख्या वाढवण्याची गरज असल्याचे लोकमत पाहणीतून दिसून आले. सांगवीतील साई चौक, फेमस चौक, काटेपुरम चौक तसेच गंगानगर चौक आदी ठिकाणी पोलीस प्रशासनासाठी तपासासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून अनेक महत्वाच्या ठिकाणी अजून कॅमेरे लावणे अत्यावश्यक झाले आहे. सांगवीतील दापोडीकडे जाणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल जुनी सांगवीतून स्पायसर कॉलेज रोड, तसेच सांगवी फाट्याकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच सांगवी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया पोलीस चौकीच्या क्षेत्रातील अनेक मुख्य चौक अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे मुक्त असून पोलीस प्रशासनाने व महापालिकेकडून त्या संदर्भात उपाययोजना करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. सांगवीतील मुख्य रस्त्यावर व्यावसायिक व सोन्या-चांदीची दुकाने तसेच बँका असून, मोठे आर्थिक व्यवहार होत असतात आणि त्याचप्रमाणे चोर व पाकीटमार तसेच वाहनचोर संधीचा फायदा घेण्यासाठी नेहमीच तयार असतात. अशा घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे पोलीस तपास यंत्रणेला गुन्हेगार शोधणे सोपे जाते. त्यासाठी येणारा खर्च जरी मोठा असला तरी तो एकाच वेळी होत असतो त्यामुळे परिसरातील ज्या ठिकाणी कॅमेरे नाहीत त्या ठिकाणी तत्काळ कॅमेरे वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी फेमस चौक येथील फॉर्च्युनर दुर्घटना असो की गणपती विसर्जन मिरवणुकीतील वाद अशा अनेक घटनांची त्या वेळेस नक्की काय घडले याची माहिती सीसीटीव्ही कॅमेरेमुळे मिळाल्याने निष्पक्ष तपास होण्यासाठी मदत होते त्यागोष्टीचे महत्त्व ओळखून प्रशासनाने परिसरातील महत्वाच्या ठिकाणी कमेºयांची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे.

खडकीतील कॅमेरे झाले खिळखिळे
खडकी येथील कॅन्टोन्मेंट हद्दीमधील नागरी वस्तीमध्ये असलेल्या ३५ सीसीटीव्ही कॅमेºयापैकी कित्येकांची दुरवस्था झाली आहे. काही खाली वाकले, काही वर आकाशात, तर काही खिळखिळे झाले आहेत. चित्रीकरण पाहण्यासाठी असलेल्या टीव्हीची स्क्रीन खराब झाली आहे. पोलिसांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभाग साधी पाहणीसुद्धा करीत नसल्यामुळे खडकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरी वस्तीमध्ये बहुतांश चौकांमध्ये सीसीटीव्ही लावले खरे; मात्र त्यानंतर त्याची निगा राखली गेली नाही.
महात्मा गांधी चौकात कॅमेºयांवर सतत फ्लेक्स लावले जात असल्याने तेथील कॅमेरे बिघडण्याच्या घटना नेहमी घडत असतात. कॅमेरे खाली किंवा आकाशात चित्रीकरण सुरू असते, तर हुले रस्ता येथील घोरपडे मैदान चौक व असुरखानाजवळ लावण्यात आले कॅमेरे दोन्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत, अशी माहिती खडकी बाजार पोलीस चौकीतून मिळाली आहे , नवी तालीम चौकातील तिन्ही कॅमेरे विरुद्ध दिशेला सरकले आहेत. असुरखान्याचे दोन्ही कॅमेरे

Web Title: Due to the closure of the CCTV cameras in the city, the promotion of increasing criminal crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.