शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

अपघातग्रस्त ट्रेलरमुळे आयटीयन्सची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:46 IST

पिंपळे सौदागर : चाकरमान्यांचे हाल; स्थानिकांसह पोलिसांची तारांबळ

रहाटणी : रहाटणी-पिंपळे सौदागर येथील साई चौकामध्ये मागील काही वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवार चौकाकडून वाकडकडे जाताना ४५ मीटर रस्त्यावर लोखंडी बार लावण्यात आला आहे. त्यामुळे ठरावीक उंचीची वाहने येथून जाऊ शकतात. असे असतानाही जास्त उंचीचा ट्रेलर येथून नेण्याचा प्रयत्न एका चालकाने केला. परिणामी ट्रेलर धडकल्याने हा लोखंडी बार तुटला. तुटलेला लोखंडी बार ट्रेलरमध्ये अडकला. त्यामुळे पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. सकाळी हिंजवडीकडे निघालेल्या आयटीयन्सना याचा फटका बसला. वाहनांच्या रांगा लागून आयटीयन्स या कोंडीत अडकले होते.

पिंपळे सौदागर येथील साई चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवार चौक ते साई चौकाच्या दरम्यान वाकडकडे जाण्याच्या मार्गावर जास्त उंचीचे वाहने जाऊ नयेत म्हणून लोखंडी बार लावण्यात आले होते. या लोखंडी बारला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक ट्रेलर धडकला. दोन जुन्या ट्रकच्या च्यासी या ट्रेलरमध्ये होत्या. ट्रेलरचालकाला उंचीचा अंदाज न आल्याने ट्रेलर लोखंडी बारला धडकला. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. या अपघातानंतर ट्रेलरचालक पसार झाला.

साई चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने डांगे चौकाकडून येणारी वाहतूक शिवाजी चौकातून वळवण्यात आली. या मार्गावर वाहतूककोंडी असते. त्यात ट्रेलरचा अपघात झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिकांसह वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली.

अपघातग्रस्त ट्रेलर क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या कडेला घ्यायचे म्हटले तर या ट्रेलरवर असणाऱ्या दोन जुन्या ट्रकच्या च्यासी खाली पडण्याची शक्यता होती. त्यामुळे हा ट्रेलर बाजूला कसा करावा हा मोठा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर होता. पोलिसांनी बीआरटीएस मार्गामधून वाहतूक सुरू केली. त्यामुळे सकाळी साडेदहानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.अनेकांचे प्राण वाचलेअपघातग्रस्त ट्रेलरच्या मागे व पुढे अनेक वाहने होती. ट्रेलरचालकाच्या चुकीमुळे व अंदाज न आल्याने चालकाने हा ट्रेलर लोखंडी बारच्या खालून वेगात घातला. मात्र लोखंडी बार तुटला नसता तर ट्रेलरच्या पाठीमागून येणाºया अनेक वाहनांना अपघात झाला असता व यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला असता. मात्र सुदैवाने वेळेतच सर्वांनी दक्षता घेतल्यामुळे अनेकांना आपले प्राण वाचवता आले.

टॅग्स :Accidentअपघात