शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

पोलिसांचे ई-मशिन दिले फेकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 7:10 AM

वाहनचालक वाहतूक पोलिसांशी अरेरावी करण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. सांगवी येथील वाहतूक विभागाच्या रेश्मा पवार, तसेच त्यांच्या

पिंपरी : वाहनचालक वाहतूक पोलिसांशी अरेरावी करण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. सांगवी येथील वाहतूक विभागाच्या रेश्मा पवार, तसेच त्यांच्या सहकाºयांना वाहन चालकाच्या उद्धटपणाचा कटू अनुभव रविवारी आला. एका वाहनचालकाने त्यांच्या हातातील ई बिलिंग मशिन फेकून दिले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय नागेश वळसदीकर (वय २६, रा. भेगडे आळी, तळेगाव) हा आरोपी रविवारी सकाळी दहाच्या सुमारास काळेवाडीकडून शिवार चौकाकडे जात होता. त्या वेळी साई चौक ते जगताप डेअरी चौक दरम्यान पोलीस नाईक जगताप वाहतूक नियमन करीत होते. रहदारीस अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यात आरोपीने वाहन थांबवले. परिणामी वाहतूककोंडी झाली. त्या वेळी वाहतूक विभाग सांगवी येथील पोलीस शिपाई रेश्मा पवार यांंनी, तसेच जगताप यांनी आरोपीस वाहन बाजूस घेण्यास सांगितले. तसेच दंडाची पावती घ्यावी लागेल, असे सूचित केले. दरम्यान, आरोपीने त्यांच्याशी उद्धट भाषा वापरली. असभ्य वर्तन करून त्यांना ढकलून दिले. तसेच जगताप यांच्या हातातील ई-बिलिंग मशिन हिसकावून फेकून दिले. तुम्हाला पावती करण्याचा अधिकार नाही, असे म्हणत सरकारी कामात अडथळा आणला, अशा स्वरूपाची फिर्याद रेश्मा पवार यांनी दिली आहे.