वाहनचोर पोलिसांच्या जाळयात

By Admin | Updated: March 20, 2017 04:24 IST2017-03-20T04:24:15+5:302017-03-20T04:24:15+5:30

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरूणास वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३५हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त

Driving car of police car | वाहनचोर पोलिसांच्या जाळयात

वाहनचोर पोलिसांच्या जाळयात

पिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरूणास वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३५हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याने चिंचवड, भोसरी आणि देहुरोड येथून या दुचाकी चोरल्या आहेत. ही कारवाई वाकड येथील कस्पटे वस्तीत करण्यात आली. दिपक बबन ठाकूर (वय १९, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
वाकडमधील वाहन चोरीच्या घटनांचा तपास करत असताना तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड यांना एक वाहन चोर कस्पटे वस्ती येथील छत्रपती चौकात अ‍ॅक्टीव्हा मोपेड दुचाकीसह थांबला असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून त्यांनी दिपक ठाकुरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची चौकशी केली. त्याच्याकडून समाधानकारक माहीती मिळाली नाही. अधिक चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने पुणे शहर आणि ग्रामीण भागातही त्याने दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले. मौजमजा करण्यासाठी ही वाहने चोरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक तुकाराम फड, कर्मचारी अशोक दुधवे, बापु धुमाळ,
गणेश हजारे, सागर सुर्यवंशी, शाम बाबा, हेमत हांगे, मोहिनी थोपटे यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Driving car of police car