शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत डॉक्टर कोव्हीड रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी घेतात एक लाख, त्यात बेडची रक्कम वेगळीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:38 IST

पैसे उकळल्याप्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक

ठळक मुद्देबेड मिळ्वण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईक धावपळ करत असताना डॉक्टरांकडून पैसे उकळण्याचे प्रकार समोर

पिंपरी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. सरकारी रुग्णालयात वेटिंग दाखवली जात आहे. बेड मिळ्वण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईक धावपळ करत असताना डॉक्टरांकडून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. पिंपरीत बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे घेतल्या प्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी याप्रकरणी तीन डॉक्टरांना अटक केली असून, या तिघांना ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डॉ. जोत्स्ना नितीन दांडगे (वय ३२, रा. किवळे) दांडगे, असे अटक केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे आणि सचिन कसबे या तीन डॉक्टरांना पिंपरी पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेतल्याचा  प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी डॉ. कसबे यांच्या रुग्णालयात पोलिसांना तीन लाख १० हजारांची रोकड मिळून आली. 

डॉ. ज्योत्स्ना दांडगेचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे डॉ. ज्योत्स्नाला अटक करण्यात आली. डॉ. ज्योत्स्ना ही ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमधील बेड उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेत होती. दोन रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले असून त्यासाठी डॉ. ज्योत्स्ना हिने १० हजार रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्या घरातून १० हजारांची रोकड जप्त केली. सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdocterडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस