शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भुशी धरणाकडे जाणारा रस्ता तीन वाजता बंद करु नका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 21:08 IST

पावसाळा हा लोणावळ्यातील पर्यटनाचा मुख्य हंगाम असल्याने याठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेण्याकरिता लाखो पर्यटक येत असतात...

ठळक मुद्देलोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आज निवेदनाद्वारे शहर पोलिसांकडे मागणी

लोणावळा : पावसाळी पर्यटनाचे लोणावळ्यातील सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असलेल्या भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीन वाजता बंद करु नका, अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आज निवेदनाद्वारे लोणावळा शहर पोलिसांकडे करण्यात आली.     पावसाळा हा लोणावळ्यातील पर्यटनाचा मुख्य हंगाम असल्याने याठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेण्याकरिता लाखो पर्यटक येत असतात. येथील भुशी धरणाच्या पायर्‍यांवर बसून चिंब भिजण्याचा आनंद घेण्याकडे पर्यटकांचा सर्वाधिक ओढा असतो. मात्र, यामुळे निर्माण होणारी वाहतुक कोंडी सोडविण्याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने गर्दीच्या वेळी भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीन वाजता बंद केला जातो. भुशी धरण व परिसरात राहणार्‍या नागरिकांचा तसेच लोणावळ्यातील व्यवसायकांकरिता हा सुगीचा कालावधी असताना या काळात रस्ता बंद केल्याने त्यांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होत आहे. याकरिता धरणाकडे जाणारा रस्ता खुलाच ठेवावा तसेच टपरी व लहान व्यावसायकांना रात्री दिड वाजेपर्यत दुकाने खुली ठेवण्याची मुबा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनावर पावसाळ्यात अतिरिक्त ताण येत असल्याने त्यांना पोलीस मित्र म्हणून पक्षाचे स्वंयसेवक देखिल उपलब्ध करुन दिले जातील असे देखिल या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.    शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटक व नगरसेविका शादान चौधरी, लोणावळा शहरप्रमुख नगरसेवक सुनिल इंगूळकर, नगरसेविक शिवदास पिल्ले, सिंधू परदेशी, विजय आखाडे व शिवसैनिक यांनी पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाDamधरणShiv Senaशिवसेना