कुंटणखान्यांना लागले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:00 IST2017-08-01T04:00:07+5:302017-08-01T04:00:07+5:30
ताथवडे, वाकड परिसरात राजरोसपणे तरुणींची एस्कॉर्ट करणारी टोळी सक्रिय असून सेक्स रॅकेट चालविणारी शहरभर मोठी साखळी असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले.

कुंटणखान्यांना लागले टाळे
पिंपरी : ताथवडे, वाकड परिसरात राजरोसपणे तरुणींची एस्कॉर्ट करणारी टोळी सक्रिय असून सेक्स रॅकेट चालविणारी शहरभर मोठी साखळी असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले. ताथवडे परिसरातील सेक्स रॅकेट टोळी हादरली. हॉटेल, लॉजचालक, तरुणींची वाहतूक करणारी वाहनचालकांचा चमू, वेश्या व्यवसायास तरुणी पुरविणारे दलाल यांचे धाबे दणाणले. वेश्या व्यवसाय रॅकेटची भांडाफोड होताच, पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली. २० दिवसांत ठिकठिकाणचे लॉज, मसाज पार्लर या ठिकाणी पोलिसांनी धाडसत्र अवलंबले असून पुण्यातील बुधवारपेठेतील २० कुंटणखान्यांनाही पोलिसांनी टाळे ठोकले आहे.
ताथवडे परिसरात राजरोसपणे तरुणींची एस्कॉर्ट सुरू असल्याचे वास्तव लोकमतने मांडले. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली. कोणत्याच प्रकारचे अवैध धंदे शहरात दिसता कामा नयेत. अशा सूचना त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांना दिल्या.
पोलीस आयुक्तांनी सक्त ताकीद दिल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचाºयांची धावपळ उडाली. लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, ६ जुलैला सकाळीच तरुणींच्या एस्कॉर्टची ताथवडेतील यंत्रणा कोलमडली. पोलिसांची
कारवाई होईल या भीतीने हॉटेल, लॉजचालक यांनी तेथून पळ काढला. मुंबई- बंगळुरू महामार्गावर ताथवडे येथे सर्व्हिस रस्त्यावर घिरट्या मारणाºया काळ्या काचेच्या मोटारी गायब झाल्या.
शहरभर पोलिसांनी धाड सत्र राबवून मसाज सेंटर आणि लॉजवर आठ ठिकाणी कारवाई केली.