दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:17 AM2018-10-29T03:17:08+5:302018-10-29T03:19:00+5:30

किराणा, कपडे खरेदीस गर्दी; पिंपरी, उपनगरातील बाजापेठेत कंदील दाखल

Diwali is expensive pulse | दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग

दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग

Next

पिंपरी : दिवाळीचा फराळ करण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा किराणा स्वस्त झाला आहे, तर अनेक साहित्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. सरकारने अन्न-धान्यावरील कर माफ केला आहे. तसेच इतर खाद्यपदार्थांवरील कर माफ केल्याने फराळासाठी लागणाºया किराणा मालाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या आहेत.

दिवाळी म्हटले की फराळाची मेजवानी ठरलेली असते. अनेक वेळा किराणा मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे फराळासाठी लागणाºया साहित्याची खरेदी करताना दिवाळे निघते. मात्र या वर्षी काही साहित्यांचे दर थोड्या प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या तयारीसाठी दसºयापासूनच भुसारबाजारातील विक्रेत्यांनी तयारी सुरू केली आहे. अनेक गृहिणींची फराळ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीला अवघे सात दिवस बाकी आहेत. त्यामुळे पिंपरीतील अनेक किराणा माल विक्रेत्यांची दुकाने गर्दीने ओसंडून वाहत आहे.

दिवाळीचा सण म्हणजे खिशाला कात्री लावणारा सण समजला जातो. मात्र वर्षातून एकदा येणारा सण म्हणून मागे-पुढे न पाहता खरेदी केली जाते. त्यामुळे प्रत्येकवर्षी दिवाळीमध्ये दिवाळे निघते. मात्र यंदाची दिवाळी सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी जीएसटीमध्ये फेरबदल केले होते. त्यानुसार अन्नधान्यावरील कर मागे घेण्यात आले होते. तसेच इतर साहित्यावरील कर १५ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम या दिवाळीमध्ये पाह्यला मिळत आहे. बेसनपीठ, चणाडाळ यांचे दर कमी झाले आहेत. तर दगडी पोहे, भाजके पोहे, खसखस, मुरमुरे यांचे दर गेल्यावर्षीप्रमाणेच आहेत. सुक्या खोबºयाची आवक कमी झाल्यामुळे खोबरे महागले आहे. सुक्या मेव्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. फराळ तयार करण्यासाठी लागणाºया खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. डालड्याची आवक घटल्याने किंमत वाढली आहे.


साहित्य आताचे दर
मुरमुरे       ६०
खसखस   ८००
साखर        ४०
तेल            ९०
चणा डाळ  ६०
खोबरे       २००
शेंगदाणे     ९५
बेसन पीठ  ६०
मैदा           २८
रवा            २८
पिठीसाखर ४५
मका पोहे    ४०
दगडी पोहे ६०

दिवाळीला सहा दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे किराणा मालाच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र अजून बहुतांश नागरिकांचे पगार झाले नाहीत. एक तारखेनंतर पगार व बोनस मिळाल्यावर ग्राहकांची संख्या वाढेल. यंदा किराणा मालाची आवक चांगली झाली आहे. त्याचप्रमाणे सरकारने जीएसटीमध्ये फेरबदल केल्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांचे खरेदीचे प्रमाणही वाढणार आहे.
- कन्हैैया ओझा,
किराणा मालविक्रेते.

Web Title: Diwali is expensive pulse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.