पिपरी: पिंपरी-चिंचवड ते पुणे या मेट्रो प्रकल्पांचा आढावा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास घेतला. संत तुकारामनगर स्टेशनवर मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवासही केला. मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेऊन सूचनाही केल्या.उपमुख्यमंत्री पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रकल्पांचीही पाहणी केली. वेळ पाळणे हा पवार यांचा गुणधर्म असल्याचा प्रत्यय आज मेट्रो अधिकाऱ्यांना आला. शहरातील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी शहरात पहाटे सहालाच पोहोचले होते. सव्वा सहाच्या सुमारास फुगेवाडीत दाखल झाले होते. सुरूवातीला मेट्रोच्या कार्यालयात कामाच्या प्रगतीसंदर्भातील बैठक घेतली. यावेळी मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित, गौतम बि-हाडे, सरला कुलकर्णी उपस्थित होते. दीक्षित यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. तसेच संगणक सादरीकरणही दाखविले.
उपमुख्यमंत्र्यांनी काढले 'मेट्रोचे पहिले तिकीट' ; अधिकाऱ्यांनी घेतला अजितदादांच्या वक्तशीरपणाचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 18:06 IST
संत तुकारामनगर स्टेशनवर मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवासही केला..
उपमुख्यमंत्र्यांनी काढले 'मेट्रोचे पहिले तिकीट' ; अधिकाऱ्यांनी घेतला अजितदादांच्या वक्तशीरपणाचा अनुभव
ठळक मुद्देअजित पवारांनी पिंपरी मेट्रोच्या कामांची केली पाहणी