शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

Positive Story: पिंपरीत महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजनची मागणी निम्याने घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 12:06 IST

एप्रिलमध्ये एका दिवसाला ५० टन ऑक्सिजनची गरज भासत होती, आता मात्र लागतोय २५ टन

ठळक मुद्देतिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत

पिंपरी: शहरातील महापालिका रुग्णालयांना एप्रिल मध्ये दिवसाला जळपास ५० टन ऑक्सिजन लागत होते. आता मे च्या शेवटच्या आठवड्यात २५ टन ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे एप्रिलच्या तुलनेत आता निम्याने ऑक्सिजनची मागणी घटली आहे. शहरातील कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या कमी होत आहे. परिणामी रुग्णालयातील दाखल रुग्णांची संख्या कमी होत आहे. ऑक्सिजन बचतीसाठी केलेले नियोजन आणि कमी झालेली रुग्ण संख्या यामुळे ऑक्सिजनची मागणी घटली आहे.

दुसरी लाट सुरू झाली तेव्हा ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जम्बो कोविड सेंटरशी करारनामा नव्हता. वायसीएम रुग्णालयाशी करारनामा होता. त्यामुळे सुरुवातीला ऑक्सिजन पुरवठा करण्यास अडचणी आल्या होत्या. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारी पासून वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मार्च मध्ये रुग्ण वाढीने उच्चांक गाठला. एप्रिल मध्ये रुग्ण वाढ सुरूच राहिली परिणामी ऑक्सिजनची मागणी वाढली. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याने सर्वत्र तुटवडा निर्माण झाला होता. ऑक्सिजनचा वापर काळीपूर्वक करा, ऑक्सिजनचे ऑडिट करा अशा सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. ऑक्सिजनची बचत करण्याचे नियोजन महापालिका प्रशासन आणि रुग्णालयानी केले.

रुग्ण संख्या कमी झाल्याने आणि ऑक्सिजनच्या बचतीमुळे ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. दुसरी लाट आता ओसर आहे. परंतु पुढील काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर त्यासाठी उपाययोजना करा अशा सूचना राज्य आणि केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर विकत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या रुग्णालयाला किती ऑक्सिजनचा साठा करता येऊ शकतो. याची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापालिका उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलGovernmentसरकारOxygen Cylinderऑक्सिजन