परप्रांतियांची चौकशी करण्याची मागणी
By Admin | Updated: April 28, 2017 05:53 IST2017-04-28T05:53:46+5:302017-04-28T05:53:46+5:30
कुदळवाडी परिसरात बाहेरून येणारे फेरीवाले, सेल्समन आणि अनोळखी व्यक्तींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार

परप्रांतियांची चौकशी करण्याची मागणी
पिंपरी : कुदळवाडी परिसरात बाहेरून येणारे फेरीवाले, सेल्समन आणि अनोळखी व्यक्तींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी पोलिसांकडे केली आहे.
दरोडा, चोऱ्या, लुटमार अशा घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत कुदळवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परराज्यातील अनेक जण कुदळवाडीत वास्तव्यास आहेत. हा परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागात अनोळखी व्यक्तींचा वावर होत असताना, त्यांची योग्य ती चौकशी व्हावी, असे निवेदन यादव यांनी दिले आहे. सचिन सोनवणे यांच्या निवेदनावर सह्या आहेत. (प्रतिनिधी)