शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल न भरल्याने देहूगावचा पाणी पुरवठा बंद; २८ लाख रुपये महावितरणची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 17:08 IST

ऐन उन्हाळ्यात विद्यूत पुरवठा खंत केल्याने पाणी पुरवठा बंद झाला असल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे

देहूगाव : इंद्रायणी नदीत मुबलक पाणी असताना देहूगावच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे 28 लाख 55 हजार 99 रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी पुरवठा योजनेसह, मैला शुध्दीकरण प्रकल्पाचा देखील विद्युत पुरवठा खंडित केल्याने देहूकरांचा गेल्या दोन दिवसांपासुन पाणी पुरवठा बंद आहे.

ऐन उन्हाळ्यात विद्यूत पुरवठा खंत केल्याने पाणी पुरवठा बंद झाला असल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नियमित पाणी बिल भरणाऱ्या सर्वसामान्य नळजोड धारक ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. देहूगाव ग्रामपंचायतीचे 8 नोव्हेंबर 2020 मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. यावेळी ग्रामपंचायतीकडे नळपाणी पुरवठा विभागाचे सुमारे 34 लाख रुपये थकले होते.

ग्रामपंचायतीचे रुपांतर होताना अनेक देणी थकीत होती. जो निधी अथवा रक्कम शिल्लक होती ती रक्कम विविध देणीदारांची देणी चुकती करण्यात खर्ची झाली होती. तर काही देणी नंतर देण्यात आली. त्यातच कोरोना चा प्रभाव वाढल्याने गावची घरपट्टी व पाणी पट्टी वसुली थकलेली आहे. कोरोनामुळेच शासनाकडून देखील निधी उपलब्धतेबाबत अडचणी येत असल्याने नगरपंचायतीचा खर्च कसा भागवावा हा देखील प्रशासकांच्या पुढे यक्षप्रश्न आहे.

एकंदरीत नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीकडे वीज बिल भरण्यासाठी शिल्लक रक्कम नव्हती. त्यामुळे एक महिन्यापुर्वीच महावितरणकडून याबाबत वीजजोड तोडण्याची कारवाई करण्यात येणार होती. परंतू खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिष्टाईमुळे ती कारवाई थांबली होती व सहा महिन्यात टप्प्या टप्प्याने नगरपंचायत ही बिले भरेल असे सांगितले होते. नगरपंचायत रक्कम भरणे अपेक्षित होते. परंतू प्रशासनाने कडून ही रक्कम भरली न गेल्याने महावितरणने कारवाई करत बुधवारी सकाळी 11 वाजता बोडकेवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा विद्यूत पुरवठा खंडित केला आहे.

याबाबत महावितरणचे शाखा अभियंता अनिल मुरदडगौंडा यांनी सांगितले, नगरपंचायतकडे अद्यापही 28 लाख 55 हजार 99 रुपये थकीत आहे. या महिन्यात नगरपंचायतीने काही रक्कम भरणे अपेक्षित होते, परंतू त्यांनी ती रक्क्म भरली नसल्याने विद्यूत पुरवठा खंडित केला. 

माजी सरपंच हेमा मोरे म्हणाल्या की, देहूचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र प्रशासक आवश्यक असून येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर नगरपंचायतीवर मोर्चा नेण्यात येईल अशा इशारा दिला आहे.         

टॅग्स :dehuदेहूmahavitaranमहावितरणcorona virusकोरोना वायरस बातम्याWaterपाणीgram panchayatग्राम पंचायत